श्रीनगर -जम्मू काश्मीरमधीलराजौरी सेक्टरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई करताना एक कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी (जेसीओ) आणि चार सैनिकांना विरमरण आले. यापूर्वी आज सकाळी जम्मू -काश्मीरच्या अनंतनाग आणि बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकींमध्ये दोन दहशतवादी ठार झाले आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी अनंतनाग जिल्ह्यातील वेरीनाग भागातील खगुंड येथे घेराव आणि शोधमोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
दहशतवाद्यांकडून सामान्यांना लक्ष केले जात आहे. काश्मीरमधील सांप्रदायिक सौहार्द नष्ट करण्यासाठी सामान्य नागरिकांवर हल्ले होत आहे. गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी काश्मीरी पंडित, हिंदू आणि शीख समुदायाच्या नागिरकांना लक्ष्य केले होते. यात जवळपास 7 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर केंद्रीय गृह मंत्रालय चिंतेत आहे.
दहशतवाद आणि नक्षलवादी कारवायांवर पाळत -
दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी गृह मंत्रालय मोठी कारवाई करणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्रालायने प्रदेश नेतृत्वाशी चर्चा केली आहे. काश्मीरमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांची यादी गुप्तचर संघटना आणि सुरक्षा संस्थाकडून यादी मागितली आहे. तसेच दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. मोदी सरकार इलेक्ट्रॉनिक इंटेल नेटवर्क भक्कम करत आहे. केवळ दहशतवाद आणि नक्षलवादी कारवायांवर पाळत ठेवणाऱ्या 'टीएमएस आणि एनएमबी' नेटवर्कचा देशभरात आणखी 451 ठिकाणी विस्तार केला जाणार आहे. गेल्या वर्षी सुरू केलेली ही मोहिम चालू वर्षाअखेर किंवा पुढील वर्षाच्या मध्यावर पूर्णत्वास नेण्याचा सरकारचा निर्धार आहे.
श्रीनगर -जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात आज (मंगळवारी) झालेल्या चकमकीदरम्यान लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चे तीन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा रक्षकांशी झालेल्या या चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा -Jammu-Kashmir: अनंतनागमध्ये सुरक्षा दलासोबत चकमक; एका दहशतवाद्याला कंठस्नान, शोधमोहीम सुरू