महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Hyderabad Timber Depot Fire : सिकंदराबाद लाकूड डेपोला भीषण आग, या राज्यातील 11 जणांचा मृत्यू - लाकूड डेपो आग सिकंदराबाद

सिकंदराबादमधील बोयागुडा येथील लाकूड डेपोला ( Fire broke out timber depot Secunderabad ) पहाटे आग लागली. या घटनेत 11 जाणांचा जळून मृत्यू झाला आहे, तर दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. ही घटना घडली त्यावेळी डेपोट 15 लोक उपस्थित होती.

fire broke out timber depot Secunderabad
लाकूड डेपो आग सिकंदराबाद

By

Published : Mar 23, 2022, 9:27 AM IST

Updated : Mar 23, 2022, 5:51 PM IST

हैदराबाद (तेलंगणा) -सिकंदराबादमधील बोयागुडा येथील लाकूड डेपोला ( Fire broke out timber depot Secunderabad ) पहाटे आग लागली. या घटनेत 11 जाणांचा जळून मृत्यू झाला आहे, तर दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. ही घटना घडली त्यावेळी डेपोट 15 लोक उपस्थित होते. मृत्युमुखी पडलेले कामगार बिहार राज्यातील असल्याची माहिती आहे. तेलंगणा सरकारने मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.

घटनेचे दृश्य

हेही वाचा -MP Navneet rana in Parliament : जुने अकोला विमानतळ सुरू करावे - नवनीत राणा

स्थानिकांच्या माहितीवरून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. डेपोमध्ये लाकूड होते, त्यामुळे आग लवकर पसरल्याचे अग्निशमन कर्मचाऱ्याने सांगितले. डेपोतील आग भंगार गोदामात पसरली होती. लाकूडफाटा असल्याने ही आग लगेच भडकली आणि पसरली.

पाच अग्निशमन यंत्रांच्या सहायाने आग विझवण्यात येत आहे. अग्निशमन दल घटनास्थळी येण्यापूर्वी 11 लोकांचा मृत्यू झाला होता, असे अग्रिशमन दलाने सांगितले. दरम्यान, काही जणांना जिवंत वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

सर्व मृतदेहांना हैदराबाद येथील गांधी हॉस्पिटलमधील शवागारात नेण्यात आले आहे. प्रचंड आगीत सापडल्याने मृतदेह ओळखण्यापलिकडे विद्रूप झाले आहेत. गांधी हॉस्पिटलमध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गांधी हॉस्पिटलचे सुप्रिडेंटंट राजा राव यांनी सांगितले, की ८ मृतदेह ओळखण्यापलिकडे जळाले आहेत. इतर चाचण्यांच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवली जाईल.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे- दीपक राम (३६), बिट्टू कुमार (२३), सिकंदर राम कुमार (४०), गोलू (२८), सतेंद्र कुमार (३५) , दिनेश कुमार (३५), चिंटू कुमार (२७), दामोदर महालदार (२७), राजेश कुमार (२५), पंकज कुमार (२६) आणि राजेश कुमार (२२). वरील सर्व दीड वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात हैदराबादला आले होते. यातील चिंटू, दामोदर आणि राजेश हे कठिहार येथील रहिवासी असून इतर छप्रा येथील आहेत.

हेही वाचा -धक्कादायक..! जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी दिल्ली - अहवाल

Last Updated : Mar 23, 2022, 5:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details