महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तुमच्या भावनांचा आदर करून एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार, पवारांचा कार्यकर्त्यांना शब्द - शरद पवारांचा कार्यकर्त्यांशी संवाद

तुम्हाला बोलूनच निर्णय घ्यायला हवा होता. परंतु, तो मी घेतला नाही. मात्र, तुम्हाला विचारून निर्णय घेतला असता तर तुम्ही तो घेऊ दिला नसता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला आहे. ते वाय बी चव्हाण सेंटमध्ये कार्यकर्त्यांशी बोलत होते.

शरद पवार
Sharad Pawar

By

Published : May 4, 2023, 3:34 PM IST

Updated : May 4, 2023, 6:35 PM IST

तुमच्या भावनांचा आदर करून एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार - पवार

मुंबई : तुम्हाला बोलूनच निर्णय घ्यायला हवा होता. परंतु, तो मी घेतला नाही. मात्र, तुम्हाला विचारून निर्णय घेतला असता तर तुम्ही तो घेऊ दिला नसता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. त्याचवेळी ते असही म्हणाले की, तुम्ही जी भूमिका घेतली आहे त्याचा विचार करून दोन ते तीन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल. तुम्हाला असे बसण्याची वेळ येणार नाही. तसेच, जो काही निर्णय होईल तो आपल्या भावनांचा आदर करूनच घेतला जाईल असा शब्द पवार यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना यावेळी दिला आहे. आज पवार वाय बी सेंटरमध्ये पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पवार साहेब तुमची महाराष्ट्राला गरज आहे : जोपर्यंत शरद पवार राजीनामाचा निर्णय मागे घेत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, अशा पद्धतीचा इशारा दिला. यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहिले. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पवार साहेब तुमची महाराष्ट्राला गरज आहे. आगामी काळातील निवडणुका बघता आमच्यासारख्या तरुणांना तुमच्यासारख्या अनुभवी नेत्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही राजीनामा देऊ नका. तुमच्यामुळेच पक्ष आहे अशा पद्धतीच्या विनवण्या करत अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घ्यावा असा हट्ट लावून धरला आहे.

दोन मिनिटे साधला संवाद :दोन दिवसांपासून वाय. बी. सेंटरच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न अनेक पदाधिकाऱ्यांनी केला. सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी समजूत घातली. परंतु, कार्यकर्ते ऐकत नसल्याने अखेरी शरद पवार यांनी आज संवाद साधला. अगदी दोन मिनीटेच पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित करणार नाही. दोन दिवसानंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही. आपण एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ. उद्या राष्ट्रवादीच्या समितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीच्या निर्णयानंतर आपण निर्णय घेऊ असही ते यावेळी म्हणाले आहेत.

सुप्रिया सुळे यांनी केला प्रयत्न :आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आधी सुप्रिया सुळे यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. उद्या सकाळी बैठक होणार आहे. तो पर्यंत वाट बघू नाहीतर पुन्हा तुम्ही बसा असं सांगत सुप्रिया सुळे यांनी उपोषण कर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. पुढे जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार यांच्याशी पाच जण चर्चेला चला म्हणून सांगितले. मात्र, आता चर्चा नको साहेबच आम्हाला अध्यक्ष म्हणून हवे आहेत. असा हट्ट करत सुप्रिया सुळे यांनाच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे पदाधिकारी आपल्या मागणीवर ठाम असल्याने सुप्रिया सुळे यांनी माघार घेतली.

सगळेजण शरद पवार यांचंच ऐकतात :नितीश कुमार शरद पवारांचेच ऐकतात, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन हेही सगळे पवारांचेच एकतात. वाय. एस. आरच्या मुलाला पवारच आणू शकता. राजकारणामध्ये पवारांपेक्षा देशाचा जास्त विचार करावा लागतो. २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर असताना पवारांनी हा निर्णय घेतला तर विरोधी पक्षच हतबल होईल. देशाच्या अनेक नेत्यांनी साहेबांशी संपर्क साधला. पी. सी. चाको शरद पवारांना भेटून गेले. देशातल्या सगळ्या अध्यक्षांशी मी बोललो आहे. त्यात मला सगळ्यांनी सांगितले की शरद पवार असा राजीनामा देऊ शकत नाहीत. या गोष्टीचे देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

हेही वाचा :Rahul Gandhi : पैलवांनाना पोलिसांकडून धक्काबुक्की राहुल गांधींची मोदी सरकारवर सडकून टीका

Last Updated : May 4, 2023, 6:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details