महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Dharwad Accident : क्रुझर झाडावर आदळून भीषण अपघात, सात जण जागीच ठार - धरवडमध्ये अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू

कर्नाटक राज्यातील धारवाड तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला ( 7 people died on spot in Dharwad ) आहे. क्रुझर गाडी झाडाला धडकून ( cruiser hits tree ) हा भीषण अपघात झाला ( Dharwad Cruiser Accident ) आहे.

Dharwad Accident
धारवाड क्रुझर अपघात

By

Published : May 21, 2022, 7:23 AM IST

Updated : May 21, 2022, 7:52 AM IST

धारवाड ( कर्नाटक ) : धारवाड तालुक्यातील बडावा गावात काल मध्यरात्री एका झाडावर गाडी आदळून ( cruiser hits tree ) झालेल्या भीषण अपघातात सात जण जागीच ठार ( 7 people died on spot in Dharwad ) झाले. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून, लग्न आटोपून हा अपघात झाल्याचे कळते.

मनसुरा गावातून बेनक्कनीकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. अद्वितीय (14), हरीश (13), शिल्पा (34), नीलवचा (60), मधुश्री (20), महेश्वरय्या (11) आणि शंभुलिंगम (35) अशी मृतांची नावे आहेत. जखमींना हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून क्रुझर गाडी झाडावर ( Dharwad Cruiser Accident ) आदळली. जिल्हा पोलिस अधीक्षक (एसपी) कृष्णकांठा यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस अधिकाधिक माहिती घेत आहेत.

हेही वाचा : VIDEO - कर्नाटक : मद्यधुंद ग्राम लेखापालाने दिला तहसील कार्यालयासमोर ठिय्या

Last Updated : May 21, 2022, 7:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details