महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

crime News : इन्स्टाग्रामवर चाइल्ड पॉर्न व्हिडिओ अपलोड करणाऱ्या कॉलेजच्या प्राध्यापकाला अटक - videos of children On Instagram

इंस्टाग्रामवर मुलांचे अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल कर्नाटकातील पोलिसांनी गुरुवारी बेंगळुरूमधील एका नामांकित महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या एका प्राध्यापकावर ( professor in Bengaluru ) गुन्हा दाखल ( case has been registered against the professor ) केला आहे. ( Uploading obscene videos of children On Instagram )

A college Professor Arrested
कॉलेजच्या प्राध्यापकाला अटक

By

Published : Oct 21, 2022, 10:19 AM IST

बेंगळुरू :इंस्टाग्रामवर मुलांचे अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल बेंगळुरूच्या ईशान्य विभागाच्या CEN (सायबर इकॉनॉमिक अँड नार्कोटिक्स क्राइम) पोलिसांनी एका नामांकित कॉलेजच्या प्राध्यापकाला अटक केली आहे. ( Uploading obscene videos of children On Instagram )

चाइल्ड पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन : यालहंका परिसरातील एका खासगी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या मधुसूदन (४५) याला पोलिसांनी अटक करून चौकशी केली. नंतर त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले. आरोपी विवाहित असून त्याला मूलबाळ नव्हते. त्याला चाइल्ड पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ अपलोड : ऑनलाइन सापडलेल्या मुलांचे अश्लील व्हिडिओ तो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अपलोड करायचा. एनसीआरबी अंतर्गत अधिकाऱ्यांचे एक पथक सतत व्हिडिओ अपलोड करत असल्याच्या निदर्शनास आले. तपासणी केली असता हा व्हिडिओ बेंगळुरू येथून अपलोड करण्यात आल्याचे आढळून आले. तसेच तपासादरम्यान असे समोर आले आहे की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ,प्राध्यापक त्यांना अश्लील व्हिडिओ पाठवत असल्याचा आरोप केला होता.

गुन्ह्यासाठी 7 वर्षे कारावास : आयटी कायद्याच्या कलम 67 अंतर्गत मुलांशी संबंधित अश्लील व्हिडिओ पाहणे, सोशल मीडियावर अपलोड करणे हे बेकायदेशीर कृती आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास 5 वर्षे आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी 7 वर्षे कारावास होऊ शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details