मुंबई: चार दिवसांपूर्वी मुंबईत हिंदू सकल समाजाने शिवाजी पार्क ते कामगार मंडळ कार्यालयादरम्यान काढलेल्या रॅलीत टी राजा यांनी भाषण केले. त्या दरम्यान, त्यांनी द्वेषपूर्ण भाषण केले असा आरोप त्यांच्यावर झाला आहे. त्यानंतर त्यांच्या भाषणाची चौकशी केली असता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती दादर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील गोशामहल येथील आमदार सिंग यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 153A(I)(a) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी येथील कार्यक्रमात समुदायाला उद्देशून प्रक्षोभक विधाने केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू समाजाला, विशेषतः महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
त्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल : मुंबईत जानेवारी 2023 मध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला एक रॅली काढण्यात आली होती. त्यामागचा उद्देश हा महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर तरतुदींची मागणी हा होता. दरम्यान, याच रॅलीदत टी राजा सिंह यांनी एक भाष केले. आणि त्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत झाला. या व्हिडीओतील राजा यांचे भाषण दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशा स्वरुपाचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.