देवास (म.प्र) -कुठलेही काम शिकण्याला वयाचे बंधन नाही. याचा प्रत्यय देवास येथील एका घटनेतून आला आहे. जिल्ह्यातील बिलावली गावात राहणाऱ्या वृद्धा रेशम बाई या केवळ तीन महिन्यांत वाहन चालवणे शिकल्या. त्या अनुभवी ड्राइव्हर सारख्या कार चालवतात. विशेष म्हणजे, त्या 90 वर्षांच्या आहेत. या वयात देखील त्या चांगल्या प्रकारे कार चालवत असल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील ट्विट करून त्यांचे कौतुक केले आहे.
हेही वाचा -अबब..! ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वत:चा मास्क माजी मंत्र्यांना घातला, पाहा व्हिडिओ..
तीन महिन्यांत शिकली ड्राइव्हिंग
आपली नात गाडी चालवत असल्याचे पाहून रेशम बाई यांनी देखील आपल्या मुलांपुढे कार चालवण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी अनेकदा त्यांच्या मुलांनी त्यांना कार न चालवण्यास समजवून सांगितले, मात्र रेशम बाईंनी त्यांचे ऐकले नाही. त्यानंतर त्यांच्या छोट्या भावाने त्यांना ड्राइव्हिंग शिकवली. रेशम बाई यांना गॅजेट्सही आवडतात, असे त्यांच्या कुटुंबातील सदस्य सांगतात. लोकांना मोबाईल वापरत असल्याचे पाहून रेशम बाई यांना देखील टच स्क्रिन मोबाईल वापरण्याची इच्छा झाली, त्यामुळे त्यांना अँड्रॉईड मोबाईल देखील देण्यात आला आहे.