विजयवाडा - नियमीतपणे काम केल्यास वयाचा अडथळा येत नाही हे विजयवाडा येथील एका ६२ वर्षीय व्यक्तीने सिद्ध केले आहे. ज्या वयात बहुतेक लोक विश्रांती घेण्यास प्राधान्य देतात, त्या वयात त्यांनी फिटनेसला महत्व दिले आहे. त्यांच्या सातत्यपुर्ण व्यायामाने या वयात त्यांचे सिक्स-पॅक चांगलेच दिसत आहेत. वयाबद्दल काहीही भ्रम असतात. परंतु त्यांनी त्यावर मात केली आहे. नियमित व्यायाम करून त्यांनी सिक्स-पॅक बॉडी कमावली आहे.
कॅनडातून आलेल्या त्यांच्या मुलाने घरी जिम लावली - विजयवाडा येथील या व्यक्तीचे नाव आहे रामकृष्ण ते नियमित व्यायाम करत असले तरी, सिक्स-पॅक कमावण्याची त्यांची धडपड अलिकडील काळातील आहे. रामकृष्ण तब्येतीची काळजी घेण्यासाठी रोज चालतात. कोरोनाच्या काळात त्यांना काही अडचणी आल्या. याच काळात कॅनडातून आलेल्या त्यांच्या मुलाने घरी जिम लावली आणि दोघांनी एकत्र सराव करायला सुरुवात केली.
चांगला आहार घेण्यास सुरुवात केली - सध्या रामकृष्ण यांचा मुलगा परदेशात गेला तरी ते रामकृष्ण व्यायाम करतच राहिले. त्या वेळी, रामकृष्ण यांनी बातमीवर पाहिले की 57 वर्षीय व्यक्तीने सिक्स-पॅक मिळवले आहेत. त्यामुळे त्यांनाही वाटले की आपण हे करू शकतो. त्यानंतर त्यांनी मुलाच्या सल्ल्यानुसार, त्याने विविध प्रकारचे फिटनेस व्यायाम आणि चांगला आहार घेण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यावर आज सिक्स पॅक बनवले आहेत.