जयपुर (राजस्थान) -राजस्थानची राजधानी आणि आसपासच्या परिसरात कुत्रा चावण्याच्या घटना वाढत आहेत. अशीच एक घटना काल रविवार (दि. 25 डिसेंबर)रोजी उघडकीस आली. खोरालाडखनी येथील शाहपुरा गावात एका रस्त्यावरील कुत्र्याने 5 वर्षाच्या चिमुरडीला जखमी केले आहे. (Girl seriously injured by dog bite) या घटनेत मुलगी जखमी होऊन तीच्या फुफ्फुसाळआ छिद्र पडले आहे. सध्या जेके लोन रुग्णालयात मुलीवर उपचार सुरू आहेत.
न्यूमोथोरॅक्स नावाचा आजार होतो - जेके लोन हॉस्पिटलचे अतिरिक्त अधीक्षक डॉ. मनीष शर्मा यांनी सांगितले की, एसएमएस हॉस्पिटलमधून रेफर केल्यानंतर ही केस आली आहे. ज्यामध्ये मुलीच्या छातीच्या भागात अनेक कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना आहेत. त्यामध्ये खोलवर चाव्याव्दारेही होते, त्यामुळे फुफ्फुसात छिद्र पडले आहे. फुफ्फुसातील छिद्रातून हवा येत होती. यामुळे बालकाला न्यूमोथोरॅक्स नावाचा आजार होतो. यामध्ये, फुफ्फुसांना झाकणारा थर प्ल्युरामध्ये हवेने भरलेला असतो असही शर्मा म्हणाले आहेत.