तुमकुरू तुमकुरू जिल्ह्यातील शिरा तालुक्यातील बालेनहल्ली गेटजवळ आज रात्री उशिरा ट्रक आणि क्रूझर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला 9 People Killed. तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना तुमकूर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
9 People Killed तुमाकुरूमध्ये ट्रक आणि जीपच्या अपघातात 9 जण ठार - 9 people including 3 children killed
बालेनहल्ली गेटजवळ आज रात्री उशिरा ट्रक आणि क्रूझर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला 9 People Killed. तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.
सर्व मृत रायचूर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. क्रूझरमध्ये 20 जण होते अशी माहिती मिळाली आहे. लॉरी आणि क्रूझर यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. याप्रकरणी कलेंबेल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यानी ट्विट करुन म्हटले आहे की, कर्नाटकातील तुमाकुरू जिल्ह्यातील अपघात हृदय हेलावणारा आहे. शोकग्रस्त कुटुंबियांना सांत्वना. जखमीं लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. त्यांनी प्रत्येक मृताच्या वारसाला PMNRF कडून 2 लाख रुपये देण्याची घोषणाही ट्विटमधून केली. तसे जखमींना रु. 50,000 देण्यात येणार आहेत.