मंगळुरू (कर्नाटक)- कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका गावात आदिवासी महिलेला विवस्त्र करून तिच्यावर हल्ला करण्यात आल्याची ( woman stripped in Karnataka ) धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांच्या ( Dakshina Kannada district crime ) माहितीनुसार ही घटना 19 एप्रिल रोजी जिल्ह्यातील बेलथंगडी तालुक्यातील गुरीपल्ला गावात अनेक गावकऱ्यांसमोर घडली. सर्व आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात ( woman abuse in Guripalla )आले आहेत.
35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार जमावाने तिचे कपडे फाडले. तिला अर्धनग्न करून घटनेचा व्हिडिओ शूट केला. तिची मोठी बहीण आणि आई यांनाही मारहाण करण्यात आल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. संदीप (30), संतोष (29), गुलाबी (55), सुगुणा (30), कुसुमा (38), लोकय्या (55), अनिल (35), ललिता (40) आणि चेन्ना केशव (40) अशी आरोपींची नावे आहेत. ), सर्वजण पीडितेच्या गावातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सरकारी जमिनीचे मोजमाप करण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे ( revenue department Karnataka ) पथक गावात पोहोचले तेव्हा ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपींनी अधिकाऱ्यांच्या कामावर आक्षेप घेतला आणि सर्वेक्षकांना घटनास्थळ सोडून जाण्यास भाग पाडून गोंधळ घातला. त्यानंतर नऊ जणांच्या जमावाने ( nine member gang ) महिलेवर हल्ला केला, अशी माहिती सूत्रांनी दिली. बेलथंगडी पोलीस ( Belthangady police ) या प्रकरणाचा तपास करत आहेत.