अमरावती - देशात कोरोना कहर असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाबाधितांची आणि मृतांची वाढती संख्या लक्षात घेता सर्वच , प्रशासकिय यंत्रणांवर प्रचंड ताण आलेला दिसून येतो. स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस कोरोनायोद्धे काम करत आहेत. असाच असाच एक मन हेलावून टाकणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंकला वेंकट लक्ष्मी या आपले नऊ महिन्याचे पोट घेऊन युद्धजन्य काळातही कर्तव्य बजावत आहेत.
अंकला वेंकट लक्ष्मी या गोदावरी जिल्ह्यात पी.गन्नावरम मंडळाच्या आरोग्य उपकेंद्रात एएनएम म्हणून कार्यरत आहेत. त्या 9 महिन्याच्या गर्भवती आहेत. मात्र, त्यांनी सुट्टी न घेता आपल्या भावना बाजूला ठेऊन देशसेवेला प्राधान्य दिले आहे. कोरोना ग्रस्त लोकांना धैर्य देत असून उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यामध्ये सक्रियपणे कार्य करत आहे. आपली जबाबदारी चोखपणे सांभाळत आहेत.