आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- नितेश राणेंच्या जामीन अर्जावर न्यायालय आज देणार निर्णय -
आमदार नितेश राणे आणि त्यांचा खासगी सचिव राकेश परब यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी दोन्ही पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला आहे. मात्र, याबाबतचा निर्णय न्यायालयाने बुधवारपर्यंत राखून ठेवला आहे. बुधवारी दुपारी यासंदर्भात निर्णय दिला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले आहे.
- अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
कथीत वसुली प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे सद्या ईडीच्या ताब्यात आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
- सचिन वाझे चांदीवाल आयोगासमोर हजर होणार
अँटेलिया बाँम्ब प्रकरण आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेले पोलीस कर्मचारी सचिन वाझे आज चांदीवाल आयोगासमोर हजर होणार आहे.
- बुल्ली बाई अॅप प्रकरणातील आरोपींच्या जामीनावर आज निकाल
बुल्ली बाई अॅप प्रकरणातील आरोपी विशाल कुमार झा आणि श्वेता सिंगच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे.
- हिंगणघाट जळीत हत्याकांड प्रकरणाचा आज निकाल
वर्ध्यातील बहुचर्चित हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात प्रतीक्षेत असलेला निकाल आज येणार आहे. 5 फेब्रुवारीला निकाल येणार होता. पण निकाल देण्यास न्यायालयाने असमर्थता दर्शवल्याने 9 फेब्रुवारीला निकाल निश्चित देणार, अशी माहिती सरकरी वकील यांनी दिली होती.
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
कालच्या महत्वाच्या बातम्या
- मुंबई -राज्यात कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात आली असून गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या स्थिरस्थावर असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सहा हजार रुग्ण सापडले होते. आज तेवढ्याच नव्या बाधितांची नोंद झाल्याचा दावा राज्याच्या आरोग्य विभागाने केला आहे. मृत्यूचा आकडा मात्र वाढला असून सोमवारी 24 तर आज 57 रुग्ण दगावले आहेत, सक्रिय रुग्ण 96 हजार इतके आहेत. ओमयक्रोनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना नियंत्रणात, आज 6 हजार 107 नव्या बाधितांची नोंद
- मुंबई -देशाच्या संसदेत बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने आजतागायत देशासाठी केलेल्या कार्याला खोटे ठरवून आणि देशामध्ये कोरोना वाढीसाठी काँग्रेस पक्ष जबाबदार आहे, असे म्हणून काँग्रेसबाबत अपप्रचार करून ज्याप्रकारे काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, काँग्रेस विरोधात जी काही गरळ ओकलेली आहे, त्याचा मी जाहीर निषेध करत आहे. पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसून धाधांत खोटे बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील व जगातील पाहिले पंतप्रधान आहेत, अशा परखड शब्दांत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.
पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसून धाधांत खोटे बोलणारे नरेंद्र मोदी हे देशातील व जगातील पाहिले पंतप्रधान - भाई जगताप
- अकोला -बच्चू कडू यांनी निधी चोरला, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर ( Prakash Aambedkar Alligation On Bacchu Kadu ) यांनी केले होते. यावर पालकमंत्री बच्चू कडू ( Bacchu Kadu Replied To Prakash Ambedkar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांनी आरोप करून अपेक्षा भंग केला आहे. मी त्यांना दोन तीन वेळा फोनही केला, मी त्यांना भेटायला गेलो होतो, ते भेटले नाही. पण माझा निधी चोरण्याचा प्रश्न येत नाही, ज्यादिवशी निधी चोरण्याचा प्रश्न येईल, त्यादिवशी बच्चू कडू पदावर राहणार नाही, असे ते म्हणाले.
Akola ZP Road Scam : त्यादिवशी मी पदावर राहणार नाही, बच्चू कडूंचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्यूत्तर
- मुंबई: मुंबईमध्ये डिसेंबर महिन्यापासून कोरोनाची तिसरी लाट आली आहे. ही लाट आता ओसरत आहे. रुग्णसंख्या ३०० पर्यंत आली आहे. आता फक्त मुंबईत एकच इमारत सील आहे. पुढील आठवड्यापर्यंत मुंबईमध्ये १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल. यामुळे रुग्णसंख्या अशीच कमी राहिली तर फ्रेबुवारीच्या शेवटी मुंबई पूर्णपणे अनलॉक होईल असे महापौरांनी सांगितले. विरोधकांकडून आरोप केले जात आहेत मात्र जे काही अनलॉक झाले ते सर्व मुंबईकरासाठी केले असेही महापौर म्हणाल्या. मुंबईमध्ये रुग्णसंख्या कमी झाली असली तरी केंद्र आणि राज्य सरकार मास्क घाला सांगत आहे. मुंबईकरांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन महापौरांनी केले.
Mayor On Mumbai Unlock : मुंबई लवकरच पूर्णपणे अनलॉक, लता दिदींचा वापर राजकारणासाठी नको - महापौर पेडणेकर