डेहरादून - उत्तराखंड राज्यातील मंदाकिनी नदीच्या काठावर केदारनाथ मंदिर बांधले गेले आहे. केदारनाथ हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक आहे. 16 जून 2013 साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले व मंदिर परिसराचे देखील मोठे नुकसान झाले. परंतु दगडी केदारनाथ मंदिराला मात्र धक्का पोहचला नाही. केदारनाथमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जिवितहानी आणि वित्तहानी झाली होती. ते अत्यंत दु:खद, विनाशकारी आणि चित्तभेदक होते.
मोठ्या प्रमाणावर जिवितहानी आणि वित्तहानी.. आठ वर्षे लोटली आहेत, परंतु त्या भयानक आठवणी अजूनही अंगावर शहारे उभे करतात. मुसळधार पावसामुळे मंदाकिनी नदीने भीषण रूप घेतले होते. पूरात 6 हजाराहून अधिक लोक बेपत्ता झाले. तथापि, ठार झालेल्यांची अधिकृत आकडेवारी अद्याप स्पष्ट नाही. आजही केदार घाटीत सांगाडे सापडतात. केदारनाथ यात्रेसाठी देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या हजारो लोक बेपत्ता झाले होते. आजही या संकटात बेपत्ता झालेल्यांचे नातेवाईक परिसरात त्यांचा शोध घेत असतात.
केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले उत्तराखंडमधील लोकांनी हळूहळू आपले जीवन पुन्हा रुळावर आणले आहे. घरे पुन्हा उभारली असून केदार घाटीही पूर्णपणे बदलली आहे. तथापि, या दुःखद घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. त्याच्या आठवणी आजही कायम असून, त्या घटनेमुळे प्रत्यक्षदर्शींच्या हृदयाचा ठोका आजही चुकतो.
मुसळधार पावसामुळे मंदाकिनी नदीने भीषण रूप घेतले होते. काळही भरवू शकला नाही ही जखम...
- सरकारी आकडेवारीनुसार 4,400 हून अधिक लोक ठार.
- 4,200 हून अधिक गावांचा संपर्क तुटला.
- 991 स्थानिक नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी मरण पावली.
- 11 हजाराहून अधिक जनावरे वाहून गेली किंवा ढिगाऱ्याखालीदफन झाली.
- 1,300 हेक्टर जमीन पूरात वाहून गेली.
- 2,141 इमारती नष्ट झाल्या.
- 100 हून अधिक हॉटेल्स जमीनदोस्त
- 90 हजार प्रवाशांना सैन्याने केदारघाटीतून रेस्क्यू केले.
- 30 हजार स्थानिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
- आपत्तीच्या वेळी 9 एनएच आणि 35 राज्य महामार्गाचे नुकसान झाले.
अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणी!