चित्रदूर्ग - कर्नाटकमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. चित्रदूर्गमध्ये 88 वर्षांच्या आजीबाई सरपंच बनल्या आहे. आता पुढील पाच वर्ष त्या गावाचा कारभार पाहतील. दक्षिणाम्मा असे त्या आजीबाईंचे नाव आहे.
कर्नाटकमध्ये 88 वर्षांच्या आजीबाई बनल्या सरपंच - 88 years old Grandmother becomes SARPANCH
चित्रदूर्गमध्ये 88 वर्षांच्या आजीबाई सरपंच बनल्या आहे. आता पुढील पाच वर्ष त्या गावाचा कारभार पाहतील. ऐवढच नाही तर आजीबाई इंग्रजीही बोलू शकतात.
वयाच्या 88 व्या वर्षात असलेल्या दक्षिणाम्मा यांची ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. दक्षिणनामाम्मा या आजीबाईंनी तालुक्यातील कोडगावल्ली गावात ग्रामपंचायत निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये त्यांनी बाजी मारली आणि ग्रामपंचायतीचे अध्यक्षपदही जिंकले.
निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी गावातील अनेक ठिकाणी भेट दिली. गावातील लोकांच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत. ऐवढच नाही तर आजीबाई इंग्रजीही बोलू शकतात. या आजीबाईनी पुढील पाच वर्षांत गावचा कायापालट केला तर इतिहासच घडेल.