बोताड (गुजरात) - गुजरातमध्ये दारु बंदी लागू केलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यात बेकायदेशीर दारुचा सुळसुळाट सुरु आहे. यावरुन मोठ्या प्रमाणात अनेक वाद निर्माण झाले असून राजकीय भांडणही पाहायला मिळत आहे. अश्यातच बोताड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बेकायदेशीर दारु पिल्या १० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यासोबतच आठ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धंधुका येथे सहा आणि बोताड रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला.
आताच हाती आलेल्या माहितीनुसार,धंधुकामध्ये बनावट दारू प्यायल्याने चार जणांचा मृत्यू आहे. तर सहा जणांना पुढील उपचारासाठी अहमदाबादला हलवण्यात आले अशी माहिती डॉ. संकेत, वैद्यकीय अधिकारी धंधुका यांनी दिली आहे.