भोपाळ :मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये असणाऱ्या जिवाजी विद्यापीठाच्या आठ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. हे कर्मचारी विद्यापीठाच्या आवारात पॉर्न पाहत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. यानंतर यासंदर्भात तपास करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली.
हकालपट्टी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सहा सेवा प्रदाते, एक कायमस्वरुपी कर्मचारी आणि एका अतिथी व्याख्यात्याचा समावेश होता. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
बरेच पॉर्न व्हिडिओ डाऊनलोडही केले..