महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Student Shot inside Class : सरकारी शाळेची सुरक्षा ऐरणीवर; क्लास सुरू असतानाच सातवीतल्या विद्यार्थ्यावर झाडल्या गोळ्या - वर्गातच विद्यार्थ्यावर गोळीबार

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरोली गावातील सरकारी शाळेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी एका तरुणाने वर्गात घुसून सातवीच्या विद्यार्थ्यावर गोळ्या झाडल्या (Class VII student was shot at in side the class room). या घटनेनंतर शाळेच्या आवारात चेंगराचेंगरी झाली (Dholpur School). गोळीबार केल्यानंतर आरोपी तरुण घाबरून घटनास्थळावरून पळून गेला.

firing
ढोलपूर येथे गोळीबार

By

Published : Nov 4, 2022, 5:45 PM IST

ढोलपूर (राजस्थान) - जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरोली गावातील सरकारी शाळेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी एका तरुणाने वर्गात घुसून सातवीच्या विद्यार्थ्यावर गोळ्या झाडल्या (Class VII student was shot at in side the class room). या घटनेनंतर शाळेच्या आवारात चेंगराचेंगरी झाली (Dholpur School). गोळीबार केल्यानंतर आरोपी तरुण घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. त्याचवेळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी विद्यार्थ्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

सातवीतल्या विद्यार्थ्यावर झाडल्या गोळ्या

जखमी विद्यार्थी रुग्णालयात दाखल -पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात जबाब घेऊन कारवाई सुरू केली आहे. पीडित मुलगा हा 16 वर्षीय असून, तो सातव्या वर्गात शिकत होता. यादरम्यान शाळा सुरू असतानाच गावातील युवक सचिन पुत्र रामबरन हा अवैध देशी कट्टा घेऊन शाळेत पोहोचला. त्यानंतर त्याने पीडित मुलावर गोळीबार केला. यात तो मुलगा जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणत्या कारणामुळे गोळीबार केला हे अजून स्पष्ट झाले नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांकडून अधिक तपास सुरू -आरोपी सचिनने पिस्तुलाने गोळीबार केला होता. गोळीबार केल्यानंतर विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आणि मानेवर गोळ्या लागल्या होत्या. या घटनेनंतर शाळेतील शिक्षकांनी कुटुंबीयांना यासंदर्भात माहिती दिली. माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेबाबत पोलीस स्टेशन प्रभारी अनिल जसोरिया यांनी सांगितले की, जखमी विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details