महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Azadi ka Amrit Mahotsav : सविनय कायदेभंग चळवळीतील दक्षिणचा चेहरा, 'यांना' म्हणत केरळचे गांधी - केरळचे गांधी सी. कृष्णन नायर, तीत, राघव पोथुवाल, शंकरजी आणि तपन नायर

सविनय कायदेभंग चळवळीचा एक भाग म्हणून 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी सुरू केलेल्या मीठ सत्याग्रह मोर्चाचे ( Satyagraha ) देशभरातील भारतीयांनी खुल्या हातांनी स्वागत केले. 1882 च्या मीठ कायद्याने ब्रिटिशांनी भारतात मीठाची मक्तेदारी केली. ही मक्तेदारी मोडून काढणे आणि मीठ सार्वत्रिक करणे, हे गांधीजींचे ध्येय होते. महात्माजींच्या आवाहनावरून केरळनेही मिठाच्या ( Freedom Movement in Kerala ) सत्याग्रहात भाग घेतला.

स्वातंत्र्याची 75 वर्षे
स्वातंत्र्याची 75 वर्षे

By

Published : Dec 11, 2021, 6:05 AM IST

Updated : Dec 11, 2021, 12:27 PM IST

कन्नूर (केरळ) -'या मूठभर मीठाने मी ब्रिटीश साम्राज्याचा पाया हादरवून टाकीन.' हातात मीठ धरत हे वाक्य महात्मा गांधींनी ( Mahatma Gandhi ) 6 एप्रिल 1930 रोजी दांडी समुद्रकिनारी सांगितले होते. त्यांचे हे विधान अक्षरशः खरे ठरले. सविनय कायदेभंग चळवळीचा एक भाग म्हणून 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी सुरू केलेल्या मीठ सत्याग्रह मोर्चाचे ( Salt Satyagraha ) देशभरातील भारतीयांनी खुल्या हातांनी स्वागत केले. 1882 च्या मीठ कायद्याने ब्रिटिशांनी भारतात मीठाची मक्तेदारी केली. ही मक्तेदारी मोडून काढणे आणि मीठ सार्वत्रिक करणे, हे गांधीजींचे ध्येय होते. महात्माजींच्या आवाहनावरून केरळनेही मिठाच्या ( Freedom Movement in Kerala ) सत्याग्रहात भाग घेतला.

केरळमधील स्वातंत्र्य लढ्याची कहाणी
  • दांडी यात्रेत 'यांचा' होता सहभाग

गांधीजींसोबत, सी. कृष्णन नायर, तीत, राघव पोथुवाल, शंकरजी आणि तपन नायर यांनी दांडीयात्रेत भाग घेतला. केरळमधील मीठ सत्याग्रहाचे केंद्रे कन्नूरमधील पय्यनूर आणि कोझिकोडमधील बेपोर ही होती. केरळमध्ये प्रथमच 'केरळ गांधी' या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या के. केलप्पन यांच्या नेतृत्वाखाली पय्यनूरमध्ये मीठ तयार करण्यात आले. महम्मद अब्दुल रहमान यांनी बेपोर येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले.

  • केरळचे पहिले मीठ सत्याग्रह

पय्यनूर येथील उलियाथु कडवू येथे ब्रिटीशांच्या ताब्याविरुद्ध मीठ-तयार आंदोलन झाले. के. केलप्पन, मोयारथ शंकर मेनन आणि सी.एच गोविंदन नांबियार यांनी या संपाचे नेतृत्व केले. 9 मार्च 1930 रोजी वडकारा येथे झालेल्या केपीसीसीच्या बैठकीत यासाठी परवानगी देण्यात आली. कोझिकोड येथून निघालेल्या 32 सदस्यांच्या मिरवणुकीत के. केलप्पन हे नेते आणि के.टी. कुंजीरमन नांबियार हे प्रमुख होते.

हेही वाचा -स्वातंत्र्याची 75 वर्षे : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अज्ञातवासातील महत्त्वपूर्ण बंगला 'गिड्डापहार'

  • कृष्णा पिल्लईचे 'ते' गाणे

13 एप्रिल 1930 रोजी कृष्णा पिल्लई यांनी गायलेल्या 'वाझका भारतसमुदयम्' या ब्रिटीश-विरोधी गीताचे उत्साहात स्वागत झाले आणि मिरवणुकीला सुरुवात झाली. मोयरथ कुंजी शंकर मेनन, पी कुमारन आणि सी.एच. गोविंदन यांनी वाटेत स्वागताची व्यवस्था केली. 21 एप्रिल रोजी ही मिरवणूक पय्यनूर येथे पोहोचली. दुसऱ्या दिवशी मिरवणूक उलियाथु कडवू येथे पोहोचली. घोषणाबाजी आणि राष्ट्रगीतांच्या वातावरणात ब्रिटिश कायद्याचे उल्लंघन झाले. हीच घटना उलियाथु कडवू-पय्यनूर अर्थात केरळच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली.

  • ब्रिटीशांकडून अत्याचार

संतापलेल्या इंग्रजांनी पय्यनूर येथील सत्याग्रह छावणीवर छापा टाकला आणि आंदोलकांना मारहाण केली. के. केलप्पन यांच्यासह विविध नेत्यांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात टाकले. यामुळे लोकांमध्ये उत्साह संचारला आणि हजारो लोक स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी तयार झाले. कन्नूर, थलासेरी आणि जिल्ह्याच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. यावेळी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

  • ऐतिहासिक स्थळाकडे दुर्लक्ष

गेल्या वर्षी मिठाच्या सत्याग्रहाचा ९० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तरीही, उलियाथु कडवू या ऐतिहासिक स्थळाकडे कोणाचेच लक्ष नाही आणि हाच आता असामाजिक घटकांचा गड बनत चालला आहे. मिठाच्या सत्याग्रहाच्या ऐतिहासिक नोंदी पय्यनूर गांधी स्मृती संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. गांधींच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांची नावे आणि इतर तपशील असलेली कागदपत्रे आणि पोलिसांनी तयार केलेल्या एफआयआरची प्रतही आहे. आंदोलकांना मारहाण झालेल्या जुन्या पय्यनूर पोलीस स्टेशनचे आता गांधी संग्रहालयात रूपांतर झाले आहे. उलियाथु कडवू या ऐतिहासिक भूमीचे संरक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक आणि स्थानिकांनी केली आहे.

हेही वाचा -स्वातंत्र्याची 75 वर्षे : शहीद-ए-आझम भगतसिंग! एक क्रांतिकारक ज्याने स्वातंत्र्यासाठी चालवली केवळ एक गोळी

Last Updated : Dec 11, 2021, 12:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details