महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Road Accident : ऑटो रिक्षा आणि ट्रकची समोरासमोर धडक; अपघातात सात महिला ठार, 11 जखमी - ऑटो रिक्षा आणि ट्रकची समोरासमोर धडक

बिदरमध्ये रात्री उशिरा एक रस्ता अपघात ( Road Accident ) झाला. या घटनेत सात महिलांचा मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले आहेत. ( 7 Women Killed 11 Injured In Bidar Accident )

Road Accident
ऑटो रिक्षा आणि ट्रकची समोरासमोर धडक

By

Published : Nov 5, 2022, 12:23 PM IST

कर्नाटक: बिदरमध्ये रात्री उशिरा एक रस्ता अपघात ( Road Accident ) झाला. या घटनेत सात महिलांचा मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले आहेत. ऑटो रिक्षा आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांवर उपचार सुरू आहेत. बिदरमधील चित्तगुप्पा तालुक्यातील एका गावातील ही घटना आहे. ( 7 Women Killed 11 Injured In Bidar Accident )

काम करून घरी येताना अपघात :अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व महिला मजूर असून काम आटोपून ऑटोरिक्षाने घरी परतत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बरमलखेडा शासकीय शाळेजवळ एका ऑटो रिक्षाला ट्रकने धडक दिली. पार्वती (४०), प्रभावती (३६), गुंडम्मा (६०), यदम्मा (४०), जगम्मा (३४), ईश्वरम्मा (५५) आणि रुक्मणी बाई (६०) अशी मृतांची नावे आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

दोघांची प्रकृती चिंताजनक : अपघातात जखमी झालेल्या 11 जणांमध्ये दोन्ही वाहनांच्या चालकांचाही समावेश आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. मृतांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनाही कळवण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details