बल्ख (अफगाणिस्तान) - अफगाणिस्तानच्या चोमताल जिल्ह्यातील बल्ख परिसरात हवाई हल्ल्यात सात तालिबानी दहशतवादी मारले गेले.अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की हल्ल्यात शस्त्रे आणि दारूगोळा नष्ट करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात बल्ख प्रांताच्या चोमताल जिल्ह्यात सात तालिबानी ठार झाले. याव्यतिरिक्त, पाच जण जखमी झाले, त्याच्याजवळील शस्त्रे आणि दारुगोळा मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आले, असे असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
बाला बोलोक जिल्ह्यातही हल्ला
मंत्रालयाने फराह प्रांताच्या बाला बोलोक जिल्ह्यात इतर आठ तालिबानी दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती दिली. फराह प्रांताच्या बाला बोलोक जिल्ह्यात शुक्रवारी रात्री आठ तालिबानी दहशतवादी ठार झाले आणि तीन जण जखमी झाले. तसेच त्यांच्याजवळील शस्त्रे आणि दारुगोळा मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आले.