महाराष्ट्र

maharashtra

पाकिस्तानच्या सात हिंदू निर्वासितांना मिळाले भारतीय नागरिकत्व

By

Published : Feb 19, 2021, 7:56 PM IST

पाकिस्तानच्या सात निर्वासितांना जयपूरमध्ये भारतीय नागरिकत्व दिलं. हे निर्वासित पाकिस्तानच्या रहीमयार खान जिल्ह्यात राहत होते. जयपूरमध्ये आतापर्यंत 170 पाक निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. भारतीय नागरिकत्व मिळाल्यावर त्यांनी भारत सरकारचे आभार मानले.

पाकिस्तानच्या सात हिंदू  निर्वासितांना मिळाले भारतीय नागरिकत्व
पाकिस्तानच्या सात हिंदू निर्वासितांना मिळाले भारतीय नागरिकत्व

जयपूर -जिल्हा प्रशासनाने पाकिस्तानच्या सात निर्वासितांना भारतीय नागरिकत्व दिलं. यावेळी निर्वासितांनी नागरिकत्व नसल्यामुळे आलेल्या अडचणी सांगितल्या. गेल्या नऊ वर्षांपासून नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे निर्वासितांनी सांगितले. हे निर्वासित पाकिस्तानच्या रहीमयार खान जिल्ह्यात राहत होते.

पाकिस्तानच्या सात हिंदू निर्वासितांना मिळाले भारतीय नागरिकत्व

पाकिस्तानात आमचे मुले सुरक्षीत नाहीत. आमच्या मुलींचे भरदिवसा अपहरण केले जाते. तसेच शाळांमध्येही हिंदू मुलांसोबत भेदभाव केला जातो. त्यांना शाळेत धर्म परिवर्तन आणि इस्लामचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे आम्ही भारतात येण्याचा निर्णय घेतला. हिंदू धर्माचे नागरिक पाकिस्तान सुरक्षीत नाहीत, असे निर्वासितांनी सांगितले.

जयपूरमध्ये आतापर्यंत 170 पाक निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. यामध्ये एका संस्थेचे योगदान मोठे आहे. पाकिस्ताच्या खानपूरमधून भारतात आलेले जवाहर राम यांनी सांगितले की, ते 2006 मध्ये भारतात आले होते. आता ते मानसरोवर येथे राहतात. भारतीय नागरिकत्व मिळाल्यावर त्यांनी भारत सरकारचे आभार मानले.

भारतातील निर्वासित..

2017 मध्ये 'यूएनएचसीआर'ने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, भारतामध्ये सुमारे दोन लाख निर्वासित राहतात. हे निर्वासित म्यानमार, आफगाणिस्तान, सोमालिया, तिबेट, श्रीलंका, पाकिस्तान, पॅलेस्टाईन आणि बर्मासारख्या देशांमधून आलेले आहेत. निर्वासितांना देशात ज्याप्रकारे आश्रय दिला जातो, त्याचे इतर देशांनीही अनुकरण करावे, असेही यूएनएचसीआरने म्हटले आहे.

जागतिक निर्वासित दिन -

जगभरातील निर्वासितांच्या प्रश्नांबाबत जनजागृती व्हावी यासाठी 20 जून हा जागतिक निर्वासित दिन म्हणून पाळला जातो. निर्वासितांच्या संयुक्त राष्ट्र उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात सुमारे सत्तर दशलक्ष लोक हे निर्वासित आहेत. हे लोक युद्ध, दहशतवाद, छळवणूक किंवा इतर संकटांपासून वाचण्यासाठी आपले घरदार सोडून निघतात, आणि देशोधडीला लागतात. विशेष म्हणजे, 2018 मध्ये झालेल्या नोंदीनुसार वर्षभरात प्रत्येक मिनिटाला 25 लोक निर्वासित झाले होते. निर्वासित दिनानिमित्त जगभरातील निर्वासितांच्या समस्या ओळखून, त्यांच्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत जनजागृती करण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details