अयोध्या (उत्तर प्रदेश) - भगवान श्रीरामाची पवित्रभूमी मानल्या जाणाऱ्या अयोध्येच्या सरयू घाटावर आज (3 नोव्हेंबर) भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी 12 पणत्यांनी दीपोत्सव साजरा करण्याात आला. याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
योगी सरकारकडून अयोध्येत दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे पाचवे वर्ष आहे. यंदा कार्यक्रमाची विश्वविक्रमात नोंद होण्यासाठी योगी सरकारचे प्रयत्न आहे. नदीच्या घाटावर रामपडी येथे 7 लाख 50 हजार पणत्या पेटवून विश्वविक्रम करण्यात आला.
अयोध्या जिल्ह्यात 12 लाख पणत्या लावण्यात आल्या आहेत. तर अयोध्येत 9 लाख पणत्यांची झगमगाट दिसून आली आहे. मंगळवारी उशीरा रात्री रामपडी येथे सर्व पणत्या लावण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत इतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित सर्व पणत्या लावण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-Diwali 2021 : देशाच्या राजधानीत 'अशा' पध्दतीने साजरी करतात दिवाळी
पणत्यांची मांडणी करून तयार करण्यात आली रांगोळी
गेल्या चार वर्षांपासून अयोध्येतील रामपडी च्या परिसरात होणारा दीपोत्सव हा अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. रामपडीच्या परिसरात सर्व पणत्या पेटतात, तेव्हा सर्व परिसर उजळून दिसतो. यंदाही अशाच प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. रामपडीच्या परिसरात दीपोत्सव कार्यक्रमात लेझर शो लाईटही करण्यात आला आहे. तसेच रामकथेचा देखावाही राहिला. रामपडीच्या परिसरात विद्यार्थ्यांनी राम चरित्राच्या जीवनावर काढलेली रांगोळी दिसून आली. त्यामुळे अनेकांना रांगोळीतून राम चरित्राचे दर्शन होणार आहे. रांगोळी काढणारी विद्यार्थिनी रुचिका वर्मा म्हणाली, की साडेतीन तास परिश्रम घेतल्यानंतर भगवान राम आणि माता सीता यांच्या एका चित्रातच अयोध्या आणि राम मंदिर रेखाटलेले होते. या कार्यक्रमात सहभागी होताना आनंद झाला आहे. तसेच अभिमान वाटत आहे.