श्रीनगर ( जम्मू )- लडाखमध्ये २६ जवानांना घेऊन जाणारी बस श्योक नदीत कोसळली. सैन्यदलाच्या वाहनाचा लडाखमधील टुरटुक भागात ( vehicle accident in Turtuk sector ) अपघात झाला आहे. या अपघातात सैन्यदलाच्या 7 जवानांचा मृत्यू झाला ( 7 Indian Army soldiers death ) आहे. तर काही जवान जखमी झाले आहेत.
खटावच्या सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण - लडाख येथे लष्कराचे वाहन नदीत कोसळून झालेल्या अपघातात साताऱ्यातील खटावचे सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण आले. २६ सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला. त्यामध्ये साताऱ्यातील विसापूर (ता. खटाव) येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचा समावेश आहे. देशसेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले. या घटनेमुळे विसापूरसह खटाव तालुका शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.
जखमींना तातडीचे उपचार देण्याकरिता प्रयत्न ( soldiers vehicle accident in Ladakh ) सुरू आहेत. भारतीय हवाई दलाने गंभीर जखमी जवानांना वेस्टर्न कमांडमध्ये हलविल्याची माहिती सैन्यदलातील ( Western Command ) सुत्राने दिली आहे. अपघातानंतर लगेचच जवानांची सुटका करण्यात आली. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले, मात्र या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला असून अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे.