महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Todays Top News in Marathi : लता मंगेशकर यांच्या निधनाचा दुखवटा म्हणून आज राज्यात सार्वजनिक सुट्टी; वाचा टॉप न्यूज - आज घडणाऱ्या घडामोडी

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

top news
top news

By

Published : Feb 7, 2022, 5:55 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर

  • भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचा दुखवटा म्हणून आज राज्यात सार्वजनिक सुट्टी

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

  • नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ला प्रकरणामुळे भाजपाचे आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज ( सोमवारी ) तातडीने सुनावणी होणार आहे.

  • प्रियांका गांधी आज गोवा दौऱ्यावर

काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी आज ( सोमवार ) गोव्यात येत असून, नुवेसह कुंभारजुवे व पणजी मतदारसंघात त्या घरोघरी प्रचारात सहभागी होणार आहेत.

  • राज्यात आज होणार प्रलंबित म्हाडाची परीक्षा

म्हाडासह, टीईटी, आरोग्य भरतीच्या परीक्षांमध्ये मोठा घोळ झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षांच्या तारखा अचानक जाहीर केल्याने म्हाडाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. आता नवीन वेळापत्रकानुसार आज परीक्षा होणार आहे.

  • दिल्लीतील महाविद्यालय आजपासून सुरु होणार

आजपासून दिल्लीत शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

कालच्या महत्वाच्या बातम्या -

मुंबई -गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले ( Lata Mangeshkar Passed Away ). त्या 92 वर्षाच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी ( Breach Candy Hospital Mumbai ) रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे बंधू ह्रदयनाथ मंगेशकरांनी लतादीदींच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर बंदुकीच्या फैरींची सलामी देत लतादीदींना अखेरचा निरोप देण्यात आला.

पुणे -भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज सकाळी निधन ( Lata Mangeshkar passes away ) झालं आहे. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. लता दिदींनी आपल्या बालपणी काही काळ पुण्यातील एका वाड्यात वास्तव्य केले होते. 1940 ते 1942 या दोन वर्षे त्या तिथे राहिल्या होत्या. आज त्यांच्या आठवणीमध्ये ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींना या वाड्याचा आढावा घेतला.

पणजी ( गोवा ) : काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी उद्या ( सोमवार ) गोव्यात ( Priyanka Gandhi Goa Visit ) येत असून, नुवेसह कुंभारजुवे व पणजी मतदारसंघात त्या घरोघरी प्रचारात सहभागी होणार आहेत. नुकतेच काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी गोव्यात येत घरोघरी प्रचारात सहभाग घेतला ( Rahul Gandhi Goa Visit ) होता.

इंदौर -देशाची व्हाइस क्वीन लता मंगेशकर आज आपल्यात राहिल्या नाहीत. वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईत त्यांचे निधन झाले. लता दीदींना ८ जानेवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इंदौर हे लता मंगेशकर यांचे जन्मस्थान होते. लता मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा आणि गाण्यांच्या प्रवासाविषयी चित्रपट समीक्षक जयप्रकाश चौकसे यांनी ईटीव्ही भारतशी खास संवाद साधला.

बीड– वाळू माफियांनी वाळू उपशासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. त्यात बुडून चार मुलांचा जीव गेला आहे. गेवराई तालुक्यातील मादलमोही जिल्हा परिषद गटातील शहजाणपूर चकला येथील बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर, असे मृत बालकांचे नाव असून त्यांचे वय नऊ ते बारा वर्षांच्या दरम्यान आहे.

पुणे - भाजप नेते किरीट सोमैया काल (शनिवारी) पुणे दौऱ्यावर होते. ( Kirit Somaiya on Pune Visit ) या दौऱ्यामध्ये एसएससी बोर्ड एचएससी बोर्ड यांना भेट दिल्यानंतर किरीट सोमय्या हे पुणे महानगरपालिकेमध्ये निवेदन देण्यासाठी आले होते. मात्र, शिवसैनिकांनी आणि शहराध्यक्षांनी घोळ घालत किरीट सोमैया यांना धक्काबुक्की केली. याच्यातून ते सुखरूप बचावले. यानंतर त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details