गाझियाबाद (उत्तर प्रदेश) - शहरातील राज नगर हद्दवाढ भागातील व्हीव्हीआयपी सोसायटीच्या 14 व्या मजल्यावरुन पडल्याने 6 वर्षाच्या चिमकल्याचा मृत्यू झाला आहे. बाल्कनीत ठेवलेल्या साहित्यावर चढून तो गॅलरीतून खाली डोकावून पाहत होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन मृत्यू झाला आहे.
एक चूक आणि गेला चिमुकल्याचा जीव
घटनेपूर्वी घरात वडील उपस्थित होते. पण, मुलाने जेवण मागितल्याने मुलाचे वडील साहित्या आणण्यासाठी इमारती खाली गेले होते. मात्र, त्यावेळी ते बाल्कनीचा दरवाजा बंद करायचे विसरले. दरम्यान, लहान मुलगा बाल्कनीत गेला व ही घटना घडली.