ग्वाल्हेर ( मध्यप्रदेश ) : प्रेम आंधळं असतं हे तुम्ही ऐकलंच असेल. प्रेमात रंग, वय, उंची बघितली जात नाही. हे कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकते. अशीच एक विचित्र प्रेमकहाणी ग्वाल्हेरमधून समोर आली ( Unique Love Story Gwalior ) आहे. मुरैना जिल्ह्यातील रहिवासी 67 वर्षीय रामकली ही महिला 28 वर्षीय तरुण भोलूच्या प्रेमात पडली असून, या दोघांनीही आता 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहण्याचा निर्णय घेतला ( Real love story in Gwalior )आहे.
Unique Love Story : अजब प्रेमाची, गजब कहाणी.. ६७ वर्षीय रामकली पडली २८ वर्षीय भोलूच्या प्रेमात.. 'लिव्ह इन' मध्ये राहण्याचा निर्णय - ग्वाल्हेरमध्ये अजब प्रेमाची गजब कहाणी
'प्रेम आंधळं असतं' ही म्हण सिद्ध करत 67 वर्षीय महिला आणि 28 वर्षीय तरुण ग्वाल्हेर कोर्टात पोहोचले. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांनी लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहण्यासाठी न्यायालयात येत नोटरी करून घेतली. या दोघांच्या अजब प्रेमाची चर्चा संपूर्ण ग्वाल्हेर शहरात रंगली आहे. (Real love story in gwalior)
लग्न करायचे नाही : रामकली आणि तरुण भोलू हे कैलारस येथील रहिवासी आहेत. दोघेही एकमेकांवर प्रेम करतात पण लग्न करायचे नाही. त्यामुळे दोघांनी आपसात 'लिव्ह-इन रिलेशन' ठेवण्यासाठी दोघांनी ग्वाल्हेर जिल्हा न्यायालयाचा उंबरठा गाठला. 'लिव्ह इन'मध्ये राहत असताना यादरम्यान कोणताही वाद होऊ नये म्हणून त्यांनी नोटरी करून घेतली आहे. त्यांचे वकील प्रदीप अवस्थी यांनी सांगितले की, अशा जोडप्यांना वाद टाळण्यासाठी लिव्ह-इन रिलेशनची नोटरी मिळते. परंतु अशी कागदपत्रे कायदेशीर स्वरूपात वैध नसतात. ( Unique Case Of Live In Relationship Gwalior )