बेगुसराय ( बिहार ) : बिहारमधील बेगुसराय येथे सहा वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात ( Six year old child murdered in Begusarai ) आली. मारेकऱ्यांनी मुलाचे दोन्ही डोळे चाकूने फोडले. एव्हडे करूनही हे नराधम थांबले नाहीत तर त्यांनी त्यानंतर मुलाची जीभही कापून मृतदेह खड्ड्यात फेकून ( Missing Child Dead Body Found In Begusarai ) दिला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. ही घटना जिल्ह्यातील नीमा चांदपुरा पोलीस स्टेशन परिसरातील कुसमहौत गावातील आहे.
खड्ड्यातून मुलाचा मृतदेह सापडला: घटना बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील नीमा चांदपुरा पोलीस स्टेशन क्षेत्रातील कुसमहाट गावातील आहे. अंकुश कुमार असे मृत मुलाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी दामोदर यांचा धाकटा मुलगा अंकुश हा खेळण्यासाठी 4 वाजता घरातून बाहेर गेला होता. संध्याकाळपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. बराच शोध घेतल्यानंतर नातेवाइकांना गावातील खड्ड्यात मृतदेह दिसला. नातेवाइकांनी जवळ जाऊन पाहिले असता तो अंकुश होता. अंकुशचा मृतदेह पाहून कुटुंबीयांचा एकच आक्रोश झाला. दामोदरच्या चार मुलांमध्ये अंकुश सर्वात लहान होता.