लखनऊ -उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनऊ महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दाट धुके असल्याने एक कार उभ्या कंटनरवर जाऊन धडकली. यात कारमधील सहाही प्रवाशांना मृत्यू झाला. सर्व प्रवासी बालाजीचे दर्शन करण्यासाठी जात असल्याची माहिती मिळत आहे.
उत्तरप्रदेश : लखनऊ-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू - UP accident news
उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
10606431
दाट धुक्यामुळे झाला अपघात -
कनौज जिल्ह्यातील तालग्राम पोलीस ठाणे क्षेत्रात हा अपघात झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले असून जखमींना योग्य ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. कारमधील अपघातग्रस्त सर्व प्रवासी लखनऊ जिल्ह्यातील काकोरी पोलीस ठाणे क्षेत्रातील रहिवासी होते. जयपूर येथील बालाजी मंदिरात दर्शनासाठी सर्व निघाले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.