महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

6 people died in Gujarat : तीन ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात, रसायनाने पेट घेतल्याने सहा ठार - 6 people died in Gujarat

अरवली जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या मोडासापासून १० किमी अंतरावर कोळीखड आणि आलमपूर गावांदरम्यान शनिवारी सकाळी ९ वाजता तीन ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात सहा जण ठार ( Six killed in road accident ) झाले. अपघातानंतर ट्रकला ज्वलनशील रसायनांनी भरलेल्या बॅरलमधून आग लागली. यात 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती व्यक्त ( flammable chemicals tanker accident ) करण्यात येत आहे

रसायनाने पेट घेतल्याने सहा ठार
रसायनाने पेट घेतल्याने सहा ठार

By

Published : May 21, 2022, 5:27 PM IST

गांधीनगर- गुजरातमधील अरवली जिल्ह्यातील मोडासा तालुक्यातील कोळीखार आणि आलमपूर ( accident between Kolikhar and Alampur ) गावांदरम्यान झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू ( Six people died on the spot ) झाला. रसायनामुळे ट्रकने पेट घेतल्याची घटना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ( truck caught fire due to chemicals ) घडली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर वाहनांचेही नुकसान झाले.

सहा जण ठार-अरवली जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या मोडासापासून १० किमी अंतरावर कोळीखड आणि आलमपूर गावांदरम्यान शनिवारी सकाळी ९ वाजता तीन ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात सहा जण ठार ( Six killed in road accident ) झाले. अपघातानंतर ट्रकला ज्वलनशील रसायनांनी भरलेल्या बॅरलमधून आग लागली. यात 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती व्यक्त ( flammable chemicals tanker accident ) करण्यात येत आहे.

तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात- वाहनांतून समोरून धूर निघत होता आणि दूरवर दिसत होता. घटनेची माहिती मिळताच मोडासा अग्निशमन दलाचे पथक आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. मोडासा अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेनंतर वाहतूक कोंडी झाली होती.

चंद्रपूरातही डिझेलच्या टँकरमुळे भीषण अपघात-दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात 20 मे रोजी मूल मार्गावर गुरुवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातामध्ये तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये लागलेल्या आगीत तब्बल नऊ जणांचा जागीच होरपळून मृत्यू ( 9 killed in chandrapur accident ) झाला. सर्व मृतदेहाची राखरांगोळी झाली.

डिझेल टॅंकर व ट्रकची धडक - प्राप्त माहितीनुसार गुरुवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास वडसावरून चंद्रपूरला लाकूड घेऊन येणाऱ्या ट्रक (क्रमांक Mh 31 cq 2770) व चंद्रपूर वरून मूल कडे जाणारा डीझल टँकर (क्रमांक Mh 40 BG 4060) या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ट्रकला आग लागली. अपघात इतका भीषण होता की अनेकांचा जागीच मृत्यू झाला होता. जे जखमी होते त्यांना देखील बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. कारण डिझेलचा टँकर असल्याने लगेच वाहनाने पेट घेतला आणि बघता बघता हे दोन्ही वाहने आगीच्या विळख्यात चालले गेले.

हेही वाचा-धक्कादायक : डिझेल टॅंकर आणि ट्रकची भीषण धडक; अपघातात 9 जण जागीच जळून खाक

हेही वाचा-Mob Lynching by BJP Leader : मुस्लीम असल्याच्या संशयावरून ज्येष्ठ नागरिकाची हत्या, भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल

हेही वाचा-BA4 sub variant of Omicron : हैदराबादपाठोपाठ तामिळनाडूमध्येही आढळला ओमायक्रॉनचा बीए4 व्हेरियंट

ABOUT THE AUTHOR

...view details