बेळगावी (कर्नाटक): Vehicle hits a Tree: जिल्ह्यातील चिंचनूर chinchanoor of Belgaum Karnataka येथे गुरुवारी पहाटे यात्रेकरू जात असलेले वाहन झाडावर आदळल्याने तीन महिलांसह सहा यात्रेकरूंचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 6 people Died after Vehicle hits a Tree
या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहाव्या व्यक्तीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. रामादुर्ग तालुक्यातील हुलाकुंडा येथील ग्रामस्थ असलेल्या या सर्व मृताची ओळख पटली. या अपघातात हनमव्वा मेगादी (25), दीपा (31), सविता (12), सुप्रीता (11), मारुती (43), इंद्रव्वा (24) यांचा मृत्यू झाला.