Income Tax Red: निवडणुकीच्या धामधुमीत आयकर विभागाने हवाला मार्फत आलेले 6 कोटी केले जप्त - Income Tax Department
गोव्यात विधानसभा निवडणुकांची (Assembly elections in Goa) धामधुम सुरु असताना आयकर विभागाने (By the Income Tax Department) शनिवारी रात्री मडगाव येथे छापे टाकले. यात एका हवाला ऑपरेटर कडे 6.20 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली ती जप्त (6 crore confiscated) करण्यात आली आहे .
मडगाव: गोवा विधानसभा निवडणूक (Assembly elections in Goa) तयारीची देखरेख सुरु असताना, प्राप्तिकर विभागाने (By the Income Tax Department) शनिवारी रात्री गोव्याच्या पोलीस महानिरीक्षकांना मिळालेल्या माहितीवरून, मडगाव येथे छापे टाकले. एका हवाला ऑपरेटरच्या निवासस्थानी ही रोकड असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार झडती घेतली असता. हवाला ऑपरेटरने रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी त्याच्या निवासस्थानी एक छुपी पोकळ जागा बनवल्याचे आढळले, ज्यात रोख रक्कम सापडली होती. शिवाय, कारमधील छुप्या भागात रोख रक्कम ठेवल्याचे देखील आढळून आले. जो विशेषतः रोकड आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या वाहतुकीसाठी बनवण्यात आला होता. झडती आणि जप्तीच्या कारवाईत 6.20 कोटी रुपयांची रोकड (6 crore confiscated) जप्त करण्यात आली. विभागाने चौकशी केली असता, त्या ऑपरेटरने ही रोख हवालाची असल्याचे सांगितले. तो गोव्यातील हार्डवेअर व्यापाऱ्यांसाठी हवाला व्यवहार करतो. मात्र, हवाला ऑपरेटरच्या जबाबात विसंगती आढळून आली, असे मानले जात आहे की ही रोख गोव्यातील विधानसभा निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी आली होती. निवडणुकीदरम्यान, मतदारांना रोख रकमेचे वाटप त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी केले जाते, त्यामुळे मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीच्या उद्दिष्टांवर विपरित परिणाम होतो. प्राप्तिकर विभागाने देखरेख यंत्रणा सतर्क केली आहे आणि निवडणुकीदरम्यान रोख रकमेच्या व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.