महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

5G in India : आजपासून सुसाट धावणार तुमचा मोबईल; जाणून घ्या, 1G पासून 5G पर्यंतचा सविस्तर प्रवास

आजपासून देशात 5जी मोबाईल (5G Service in India) सेवा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज 5जी सेवेचं ( 5G SERVICE LAUNCHES IN INDIA ) उद्घाटन झाले. पहिल्या टप्प्यामध्ये भारतातील एकूण 13 शहरांमध्ये ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर हळूहळू संपूर्ण देशात 5G सेवा सुरु केली जाईल. आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा (5G Internet Service) सुरु होत आहे.

5G in India
5G in India

By

Published : Oct 1, 2022, 12:34 PM IST

Updated : Oct 1, 2022, 1:06 PM IST

नवी दिल्ली :आजपासून देशात 5जी मोबाईल (5G Service in India) सेवा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज 5जी सेवेचं ( 5G SERVICE LAUNCHES IN INDIA ) उद्घाटन झाले. पहिल्या टप्प्यामध्ये भारतातील एकूण 13 शहरांमध्ये ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर हळूहळू संपूर्ण देशात 5G सेवा सुरु केली जाईल. आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा (5G Internet Service) सुरु होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात (India Mobile Congress - IMC 2022)5जी इंटरनेट सेवा लाँच करण्यात आली आहे. यामुळे आता भारतातही इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) वोडाफोन आयडिया (Vodafone-idea) या कंपन्या स्पर्धेत आहेत. सध्या बाजारात अनेक 5G मोबाईल उपलब्ध आहेत. तर, काही कंपन्या सर्वात स्वस्त 5G मोबाईल देत आहेत. रिलायन्स जियो कंपनीने नुकताच जिओ 5G फोन (Jio 5G Phone) लाँच केला आहे.

G म्हणजे काय? - G म्हणजे जनरेशन जेव्हा जेव्हा फोनमध्ये नवीन तंत्रज्ञान आणले जाते तेव्हा त्याला पुढील पिढीचा स्मार्टफोन म्हणतात. याला आपण फोनचे बदलले स्वरूप म्हणु शकतो. पूर्वी वायर्ड फोन यायचे, नंतर कॉर्डलेस फोन आले, आता वायरलेस फोनचा ट्रेंड आहे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानातही बदल होत आहेत.

5G इंडिया लाँच

5G इंटरनेट सेवा म्हणजे ( Fifth Generation) अर्थात पाचवी पिढी असा आहे. ही सेल्युलर मोबाईल कम्युनिकेशनची पाचवी पिढी म्हणून ओळखली जाते. 5G नेटवर्क 2G, 3G, 4G नेटवर्कपेक्षा अधिक वेगवान असेल. 5G नेटवर्क 4G पेक्षा कमीतकमी 10 पटीने वेगानं इंटरनेट स्पीड देईल. 1G, 2G, 3G, 4G नंतर 5G हे नवीन जागतिक वायरलेस संवादाचे नवे स्वरुप म्हणुन समोर येत आहे. मार्शन म्यकलून यांनी म्हटले होते की जग हे एक खेडे झाले आहे. आज इंटरनेटच्या माध्यामातून जगातील कोणत्याही काणाकोपऱ्यात माणवाला संवाद साधता येते. विज्ञान तसेत तंत्रज्ञान क्रांतीमध्येही इंटरनेटचे महत्वाचे योगदान आहे. 5G तंत्रज्ञानाने जग अधिक जवळ येणार आहे.

1G पासून 5G पर्यंतचा सविस्तर प्रवास

2011 मध्ये आले 4G तंत्रज्ञान - 2011 साली 4G तंत्रज्ञान सुरु झाले. याची गती 100 Mbps म्हणजेच 1 Gbps स्पीड आहे. हे 3G सेवापेक्षा महाग आहे. तथापी या तंत्रज्ञानात जसा बदल होत जाईल तसे फोनमध्येही बदल होत जाईल.

1G पासून 5G पर्यंतचा सविस्तर प्रवास

2000 मध्ये आलेले 3G तंत्रज्ञान -2011 साली 3G तंत्रज्ञानाची सुरवात झाली. याद्वारे हेवी गेम्स, मोठ्या फाइल्स ट्रान्सफर, व्हिडीओ कॉलिंग फीचर यासारख्या सेवा देण्यात आल्या. ज्यामुळे माहीती तंत्रज्ञान क्रांतीत झपाट्याने बदल होत गेले.

1991 2G ची सुरवात : ही सेवा GSM वर आधारित होती. यामध्ये डिजिटल सिग्नलचा वापर करण्यात आला होता. त्याचा वेग 64 kbps होता. हे पहिल्यांदा फिनलंडमध्ये लाँच करण्यात आले होते. नंतर हळूहळू याचा प्रसार सर्व जागापर्यंत पोहचला. या फोनमध्ये एसएमएस, कॅमेरा, मेलिंगसारख्या सेवा होत्या.

1G ही होती पहिली पिढी - यात अॅनालॉग सिग्नलचा वापर करण्यात आला होता. याची सुरवात 1980 च्या दशकामध्ये सुरू झाली होती. त्याची गती मर्यादा 2.4 केबीपीएस वर काम करायची. याची सुविधा पहिल्यांदा अमेरिकेत देण्यात आली होती. या फोनची बॅटरी लाइफ खूपच कमी होती. एवढेच नाही तर त्यांच्या आवाजाची गुणवत्ता, सुरक्षेतही अनेक कमतरता होत्या.

इंटरनेटचा असेल 10 पट वेग-एका रिपोर्टनुसार, 5G नेटवर्क आल्यानंतर इंटरनेटचा स्पीड सध्याच्या 4G LTE पेक्षा किमान 10 पट जास्त असेल. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, इंटरनेटचा स्पीड केवळ 10 पट वेगाने जाईल असे नाही. तर हा वेग 100 पटींनीही वाढवू शकतो. इतर अहवालांनुसार, 5G चा कमाल इंटरनेट स्पीड 10 गीगाबाइट्स प्रति सेकंद (GBPS) असू शकतो, तर 4G सेवेमध्ये तो 100 मेगाबाइट्स प्रति सेकंद आहे. तसे, सुरुवातीपासून 5G लाँच होण्यापूर्वी, असा दावा केला जात आहे की 5G सेवेचा वेग सध्याच्या 4G पेक्षा 10 पट जास्त असेल.

काही सेकंदात चित्रपट डाउनलोड - 5G मध्ये संपूर्ण चित्रपट अवघ्या 10 सेकंदात डाउनलोड करता येणार आहे. सध्या दोन तासांचा चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी 7 मिनिटे लागतात. तथापि, हा वेग स्थान, डिव्हाइसवर देखील अवलंबून असेल. तुम्हाला काही वेळात सगळे काम सहज सोप्या पद्धतीने करता येणार आहे.

इथे होणार पहिली सुरवात - दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 5G नेटवर्कसह भारतातील पहिले विमानतळ बनले आहे. विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केले आहे की, टर्मिनल 3 आता प्रवाशांना 5G नेटवर्क कनेक्टिव्हिटी देण्यासाठी सज्ज आहे. आता एअरटेल, जिओने आपापली 5G सेवा सुरू केली आहे. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) ने अधिकृत निवेदन जारी केले आहे की दिल्ली विमानतळ टर्मिनल 3 वरून उड्डाण करणारे प्रवासी लवकरच 5G नेटवर्क वापरण्यास सक्षम असतील. प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, 5G नेटवर्क विमानतळावर उपलब्ध असलेल्या वाय-फाय प्रणालींपेक्षा 20 पट वेगाने इंटरनेट डेटा प्रदान करेल. प्रवासी त्यांच्या 5G कनेक्टिव्हिटी स्मार्टफोनमध्ये चांगल्या सिग्नल स्ट्रेंथचा आनंद घेऊ शकतात, उत्तम कनेक्टिव्हिटी सुविधा उपलब्ध असेल. या सर्व सुविधा प्रवाशांना टर्मिनल 3, T3 अरायव्हल्स, मल्टी लेव्हल कार पार्किंग (MLCP) येथे मिळतील.

5G नेटवर्कमध्ये दोन मोड असतील- 5G नेटवर्क प्रामुख्याने दोन मोड्स अंतर्गत उपलब्ध होणार आहे. स्टँडअलोन, नॉन-स्टँडअलोन असे याचे दोन प्रकार आहेत. दोन्ही आर्किटेक्चरचे स्वतःचे वेगळे फायदे तसेच तोटेसुद्धा आहेत. दूरसंचार ऑपरेटर दोनपैकी एक मार्ग निवडू शकतात. जिओने स्टँडअलोन मोड्स निवडले आहेत.

5G चे फायदे - 5G तंत्रज्ञान अब्जावधी इंटरनेट ऑफ थिंग्ज उत्पादने, उच्च दर्जाच्या व्हिडिओ सेवांचे फायदे जलद गतीने कनेक्ट होण्यास मदत होते. 5G तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपत्तींचे रिअल टाइम मॉनिटरिंग, अचूक शेती, खोल खाणी, विज्ञान तंत्रज्ञानात महत्वाची भूमीका बजावेल. धोकादायक औद्योगिक ऑपरेशन्स, नौसर्गिक आपत्तीमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी मदत होईल. 5G नेटवर्क एकाच नेटवर्कमध्ये वेगवेगळ्या विविध सुविधा वापरता येईल. खगोलशास्त्र, पर्यावरण, शेती, हवामान, संशोधन इत्यादीचा विषयचा वापर 5G नेटवर्कने जलद गतीने करता येइल. कोणतीही व्यक्ती किंवा कंपनी 5G चे मालक नाहीत. मोबाईल नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्या 5G नेटवर्क तुमच्या पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

किती शहरांमध्ये सुरू होणार 5G ? सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 5G सेवेचे उद्घाटन केले आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, पुणे, गांधीनगर, अहमदाबाद जामनगरसह 13 शहरांमध्ये आजपासून 5G सेवेच आंनद घेता येणार आहे. दोन वर्षांत ही सेवा देशभर सुरू होईल, असे कंपन्यांचे म्हणणे आहे.

अशी वापरा 5G सेवा - सर्वात प्रथम तुमचा फोन 5G वापरण्यासाठी सक्षम असावा लागणार आहे. तुम्हाला तुमच्या फोनमध्ये सेटिंग्जमध्ये जाऊन 5G सेवा सुरू करावी लागेल. यासाठी रिलायन्स जिओच्या ग्राहकांना नवीन सिम घ्यावे लागेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 5G सिम दिवाळीच्या आसपास महानगरांसह प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध होईल. त्याची 5G सेवा डिसेंबर 2023 पर्यंत देशातील प्रत्येक शहरात सुरू होईल. एअरटेलचे सीईओ गोपाल विठ्ठल यांच्या मते, कंपनीच्या सर्व ग्राहकांचे सिम 5G सुविधेसाठी सक्षम आहेत.

जगातील कोणत्या भागात 5G वापर होतो?संवाद तज्ञ हेमंत उपाध्याय म्हणतात की, 5G तीन मुख्य प्रकारच्या कनेक्टेड सेवांमध्ये वापरले जाते. 5G अशा प्रकारे डिझाइन केले आहे की, ते भविष्यातील सेवांसाठी देखील वापरले जाऊ शकते. अशी माहीती संवाद तंज्ञांनी दिली आहे. ग्लोबल मोबाइल सप्लायर्स असोसिएशन (GSA) नुसार, 61 देशांमधील 144 ऑपरेटर्सनी जानेवारी 2021 पर्यंत 5G सेवा सुरू केली आहे. त्याच वेळी, 131 देशांतील 413 5G सुरु करण्याच्या तयारीत आहेत. Ookla च्या 5G नेटवर्क ट्रॅकरनुसार, 5G नेटवर्क असलेल्या प्रमुख देशांपैकी एक आहे. भारताच्या शेजारी पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ बांगलादेशातही ही सेवा उपलब्ध नाही, एरिक्सनच्या अंदाजानुसार 2027 पर्यंत जगातील 75% लोकसंख्येला 5G सेवेचा लाभ घेऊ शकतील.

3GB डेटा डाउनलोड लागणार इतका वेळ?

3G: 1 तास, 8 मिनिटे

4G: 40 मिनिटे

4G LTE: 27 मिनिटे

Gigabit LTE: 61 सेकंद

5G: 35 सेकंद

Last Updated : Oct 1, 2022, 1:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details