बेळगावी: संपूर्ण देशात मांजा धाग्यावर विक्रीवर बंदी (Ban on sale of manja) आहे, त्यातल्या त्यात नायलाॅन मांजा (manjha) आधिक घातक (Nylon manja is dangerous) आहे. ज्या दिवसात मांजाची मोठ्या प्रमाणावर विक्री होते त्यावेळी मांजाच्या दुकानांवर कारवाई केल्याचे दाखवले जाते मात्र आपल्याकडे मांजाची विक्री अद्याप थांबलेली नाही. मांजा धाग्यावर मुळे देशभरात अनेक लोक जखमी होतात त्याच बरोबर अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. दिवाळी सणाच्या दिवसात रविवारी याच मांजा मुळे एका 5 वर्षीय बालकाचा मृत्यू (5 yearold boy lost his life due to Manja) झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.
बेळगावी येथे मांजाच्या धाग्याने 5 वर्षाच्या मुलाचा बळी घेतला. हुक्केरी तालुक्यातील नंतपूर गावातील रहिवासी असलेल्या वर्धन एरन्ना बेली (५) याचा बेळगावातील गांधी नगर येथील राष्ट्रीय महामार्गावर मांजामुळे गळा चिरल्या गेल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे दिवाळी सणाचा एक भाग म्हणून नवीन कपडे खरेदी करण्यासाठी हे मूल वडिलांसोबत बेळगावी शहरात आले होते.