मंगळुरू- कर्नाटकातील मंगळुरू येथे रविवारी रात्री एका माशांच्या कारखान्यात विषारी वायूच्या गळतीमुळे ( Five workers died gas leak ) पाच मजुरांचा मृत्यू झाला. हा अपघात एमएसईझेडमध्ये ( Mangalore Special Economic Zone ) झाला. उमर फारुख, निजामुद्दीन साब, समिरुल्ला इस्लाम, पश्चिम बंगालचे रहिवासी अशी मृतांची नावे आहेत.
गॅस गळतीच्या दुर्घटनेत ३ मजुरांची प्रकृती चिंताजनक ( fish factory accident ) असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यात रात्री एक कामगार कचरा टाकी साफ करण्यासाठी खाली उतरला. त्यानंतर बेशुद्ध पडला. यानंतर त्याला वाचविण्यासाठी सहकारी मजूर टाकीत उतरले. तेही ( gas leak accident in Karnataka ) आजारी पडले. कामगारांची सुटका करून त्यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिघांना मृत घोषित करण्यात आले. पाच मजुरांवर उपचार सुरू आहेत.