मातृत्व हे स्वतःची भावनांची एक मिश्रित पिशवी घेऊन येते. त्यामुळे आपल्याला आपल्या मुलांना त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व लहान-मोठ्या संकटांपासून वाचवायचे असते. मग ती लहान मुलांना होणारी एक छोटीशी ऍलर्जी का असे ना? म्हणूनच, तज्ञांनी शिफारस केलेले 5 मार्ग 5 WAYS TO MANAGE CHILDHOOD ALLERGIES आपण बघणार आहोत, जे पालकांना त्यांच्या मुलांचे ऍलर्जी पासुन संरक्षण करण्यास मदत करु शकतील. MANAGE CHILDHOOD ALLERGIES
दूध, अंडी आणि शेंगदाणे हे भारतातील सर्वात सामान्य ऍलर्जीन पदार्थ आहेत. IAP च्या सर्वेक्षणानुसार, 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 11.4 टक्के मुलांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या ऍलर्जीचा त्रास होतो आणि हा त्रास साधारणपणे मे महिन्याच्या आसपासच जास्त होतो.
ऍलर्जीची लक्षणे :वाहणारे नाक, शिंका येणे, खोकला, पुरळ येणे, लाल डोळे येण्यापासून ते जीभ सुजणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी आहेत. यामुळे मुलाला गंभीर अस्वस्थता येते आणि यामुळे पालकांना काही वेळा निराशा येते. ऍलर्जी कालांतराने हळूहळू विकसित होते; पालकांनी त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी संयम आणि वचनबद्ध असणे आवश्यक आहे. तेव्हा, असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे आपण, पालक या नात्याने, समस्यांचे प्रतिबंध आणि संभाव्य उपशमन करण्यात योगदान देऊ शकतो.
ताणतणाव दूर करा : या काळात तणावमुक्त आणि शांत राहणे खूप महत्वाचे आहे. राग व्यक्त केल्याने दुःखातच भर पडेल. एकदा आपल्याला लक्षणांबद्दल कळले की, प्रथमोपचार अँटी-अॅलर्जिक किट घरी ठेवणे हे आपले पहीले कर्तव्य आहे. आपण आपल्या बालरोगतज्ञांच्या मदतीने हे किट बनवून घेऊ शकतो.