महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

5 सप्टेंबर : 'या' राशीवाल्यांना आज मिळू शकते संतती सुख... जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

horoscope of the day
horoscope of the day

By

Published : Sep 5, 2021, 6:00 AM IST

मेष - आज कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उद्विग्न होईल. छातीतील दुखणे किंवा इतर आजारामुळे चिंतातुर व्हाल. आर्थिक खर्चात वाढ होईल. प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे. शक्यतो बौद्धिक चर्चा टाळाव्यात.

वृषभ -आज आपण जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल. विरोधकांवर मात करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान संभवतात. दुपार नंतर मात्र संघर्षमय वातावरणास सामोरे जावे लागेल. नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानहानी संभवते.

मिथुन - सकाळी आपले मन अशांत राहील. शारीरिक व मानसिक आरोग्य समाधानकारक नसल्याने आपली चिडचिड होईल. वायफळ खर्च होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकणार नाही. दुपार नंतर मात्र मित्र व स्नेहीजनांच्या सहवासामुळे मनास प्रसन्नता लाभेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भावंडांशी सौहार्दता वाढेल. कामात यशस्वी व्हाल. नशिबाची साथ लाभेल.

कर्क - आज आपण भावनेच्या भरात वाहून जाल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आज आरोग्य चांगले राहील व मन ताजेतवाने राहील. दुपार नंतर मात्र मनात निराशेची भावना येऊन ते बेचैन होईल. अवैध प्रवृत्तीमुळे मन भ्रष्ट होऊ नये ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. पैसा जास्त खर्च होईल.

सिंह -आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसाल. तेव्हा महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. गैरसमज व मतभेद होण्याची शक्यता असल्याने वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपारनंतर मात्र मित्र- स्नेही यांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल.

कन्या - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी परिस्थिती अनुकूल राहील. शारीरिक व मानसिक शांतता लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात वातावरण अनुकूल राहील. दुपार नंतर मनःस्थिती द्विधा होईल. त्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात व्यत्यय येईल. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कोर्ट-कचेरीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. धनहानी व मानहानी होण्याची शक्यता आहे.

तूळ - आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल. गृहसजावटीत बदल कराल. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य वाढेल. उच्च अधिकार्यांमुळे व्यवसायात आर्थिक लाभ होतील. आर्थिक नियोजन निष्ठापूर्वक कराल. तब्बेत उत्तम राहील. मानसिक शांतता लाभेल. संततीकडून सुख मिळेल.

वृश्चिक - आज नशिबाची साथ लाभेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या बातम्या येतील. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ सुद्धा संभवतो. नोकरीत पदोन्नती संभवते. आपले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकेल. मातेशी सौहार्दता राहील. सामाजिक मान - सन्मान प्राप्त होतील. कौटुंबिक जीवन आनंददायी राहील.

धनु - आज सकाळी आपणास प्रकृतीचा त्रास जाणवेल. नकारात्मक विचारांचा प्रतिकूल परिणाम मनःस्वास्थ्यावर होईल. सबब वैचारिक स्तरावर संयम बाळगावा लागेल. आर्थिक चणचण भासेल. दुपारनंतर मात्र शारीरिक व मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होईल. अचानक धन प्राप्ती संभवते. . व्यवसायात लाभ होईल. मित्र व स्नेही यांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. प्रवास संभवतात.

मकर - आज कुटुंबीयांसह प्रवासाचा आनंद लुटाल. दुपार नंतर मात्र मन व्याकुळ होईल. अधिक खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. सरकारी कामात अडथळे येतील. अवैध कार्यापासून दूर राहावे.

कुंभ - आजचा आपला दिवस सुखाचा व शांततेचा आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. वाहनसौख्य मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात कीर्ती होईल. वस्त्र व अलंकार ह्यासाठी पैसा खर्च होईल. एखादा प्रवास घडेल.

मीन - आज आपल्या भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल, मात्र शक्यतो भिन्नलिंगी व्यक्तींपासून दूर राहणे हितावह होईल. आज वाद होण्याची शक्यता असल्याने शक्यतो बौद्धिक चर्चा टाळा. नवीन कार्यात अडचणी येतील. दुपार नंतर परिस्थितीत एकदम बदल होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभल्याने समाधान होईल. व्यावसायिकांना कार्यालयात अनुकूल वातावरण राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.

ABOUT THE AUTHOR

...view details