जम्मू - जम्मू-काश्मीरच्या पुलावामा आणि बडगाम जिल्ह्यामध्ये चकमकीत सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान ( Five TerroRist Killed Jammu kashmir ) घातले. हे दहशतवादी 'लष्करे-ए-तैयबा' ( Lashkar E Taiba ) आणि 'जैश-ए-मोहम्मद' ( Jaish E Mohammed ) या दहशतवादी संघटनेचे होते.
गेल्या 12 तासांत झालेल्या दोन चकमकीत 'जैश-ए-मोहम्मद'चा दहशतवादी जाहिद वानी आणि अन्य चार जण मारले गेले. हे आमच्यासाठी मोठे यश आहे, अशी माहिती आयजीपी यांनी दिली.