नवी दिल्ली :नवरा बायकोच्या नात्यात सतत वाद घालणे, टीका करणे, तुलना करणे हे लग्नासाठी जितके घातक तितकेच जोडीदाराचे काही पटत नसेल तर ते बोलून न दाखवता मनात ठेवणेही वाईट. प्रेम, विश्वास निर्माण करण्यात संवादाचा वाटा खूप मोठा असतो. पण संवादाचा विसंवाद होत असेल, भांडणाचं, विसंवादाच कारणच संवाद असेल ( bad communication habits) तर संवाद साधताना आपलं काय चुकतंय हे नवरा बायकोनं तपासून घ्यायला हवं. पण संवादाचा विसंवाद होत असेल, भांडणाचं, विसंवादाचं कारणच संवाद असेल तर संवाद साधताना आपलं काय चुकतंय ( communication habits) हे नवरा बायकोनं तपासून घ्यायला हवं. नवरा बायकोच्या नात्यात दुरावा निर्माण करणाऱ्या 5 सवयी बदलल्यास संवाद सुधारतो आणि नातंही.
सतत चिडवणे :जोडीदाराची सतत टिंगल टवाळी करायची सवय किंवा चिडवणे असेल तर यामुळे जोडीदाराच्या भावना दुखावतात. एकांतात, चारचौघात मजा उडवली जात असल्यास जोडीदाराच्या मनात चीड, वैताग, न्यून भावना निर्माण करतात. जोडीदाराकडून एखादी गोष्ट उणे घडली, त्यात काही कमतरता राहिली, एखादी गोष्ट चुकली, बिघडली तर जोडीदारास कमी लेखण्यापेक्षा हसत खेळत ती गोष्ट समजून घेतल्यास जोडीदाराला वैताग नव्हे तर आधार वाटतो.
वाद घालणे :एकमेकांशी बोलणं म्हणजे लहान मोठ्या गोष्टीवरुन सतत वाद घालत राहाणे नव्हे. सतत वाद घालत राहाण्याच्या सवयीनं जोडीदार वैतागतो किंवा वैतागते. वाद घालण्याची सवय असेल तर कोणतंही कारण पुरतं. यातून जोडीदाराच्या चुकांवर सतत बोट ठेवलं जातं. वाद घालण्याच्या सवयीमुळे नात्यात सतत अंतर पडत जातं. नवरा बायकोचं नातं सांभाळताना नेहमी माझंच खरं, मीच बरोबर असं म्हणून चालत नाही. भांडण टाळण्यासाठी एक पाऊल मागे टाकलं तर नातं कित्येक पावलं पुढे जातं, घट्ट होतं.