दुर्ग - पाटण विधानसभा मतदारसंघातील खुडमुडा हत्याकांडाचे प्रकरण अद्याप सुटलेले नसताना पुन्हा एक प्रकरण समोर आले आहे. गायकवाड नामक कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. घटनेनंतर दुर्ग रेंजचे आयजी विवेकानंद सिन्हा आणि पोलीस अधिक्षक प्रशांत ठाकूर घटनास्थळी दाखल झाले. कुटुंब प्रमुख राम बृज गायकवाड (52), मुलगा संजू (24), पत्नी जानकीबाई (47), मुलगी दुर्गा (28) आणि ज्योती (21) यांचे मृतदेह सापडले आहेत.
छत्तीसगड : दुर्गमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळले
छत्तीसगडच्या दुर्गमध्ये गायकवाड नामक कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांना तपासादरम्यान घरातून एक सुसाइड नोट मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. आर्थिक अडचणीमुळे ही घटना घडल्याचे पोलिसांनी म्हटलं.
पोलिसांना तपासादरम्यान घरातून एक सुसाइड नोट मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. आर्थिक अडचणीमुळे ही घटना घडल्याचे पोलिसांनी म्हटलं. खासदार विजय बघेल यांनीही घटनेचा आढवा घेतला. आर्थिक अडचणींमुळे शेतकरी कुटुंब आत्महत्या करीत असेल, म्हणजेच सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही, हे स्पष्ट आहे, असे विजय बघेल म्हणाले.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्वतंत्र पथक स्थापन करून चौकशीचे आदेश राज्य गृह मंत्रालयाने दिले आहेत. सुसाईडनोटमध्ये मृत्यूसाठी इतर कोणालाही जबाबदार ठरवण्यात आलेले नाही. पोलिसांना असा संशय आहे, की वडिलांनी आणि मुलाने प्रथम तिघांनी एकत्र जाळले आणि नंतर त्यांनी स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.