हरिद्वार (उत्तराखंड) -हरिद्वार येथे आयोजित 'धर्म संसद' मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणाची ( Objectionable Remarks on Mahatma Gandhi ) चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्यात ( Haridwar hate speech case ) आले आहे. ही माहिती गढवालचे उपमहानिरीक्षक करण सिंह नागन्याल यांनी दिली. दोषी आढळलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
धर्म संसद द्वेषयुक्त भाषण प्रकरणात एफआयआरमध्ये सागर सिंधू महाराज आणि यति नरसिंघानंद गिरी ही आणखी दोन नावे जोडली गेली आहेत. धर्म दास, अन्नपूर्णा, वसीम रिझवी उर्फ जितेंद्र त्यागी आणि इतर काही जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 153A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय, उत्तराखंड पोलिसांनी कार्यक्रमात केलेल्या विधानांशी संबंधित आयपीसी कलम 153A (धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) अंतर्गत उत्तर प्रदेश सेंट्रल शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष रिझवी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला. रिझवी यांनी गेल्या महिन्यात हिंदू धर्म स्वीकारला आहे.