महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Drowning In Begusarai : नदीत अंघोळीसाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू

बिहारमधील बेगुसराय येथे नदीत अंघोळ करताना पाच मुलांचा बुडून मृत्यू झाला. सर्व मृतांचे वय 14 ते 20 वर्षांच्या दरम्यान आहे. आतापर्यंत एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

Drowning In Begusarai
अंघोळीसाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू

By

Published : May 5, 2023, 7:24 PM IST

अंघोळीसाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू

बेगुसराय (बिहार) : बिहारमधील बेगुसराय येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे अंघोळ करताना पाच मुलांचा बुडून मृत्यू झाला. आतापर्यंत एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. ही सर्व मुले गंडक नदीत आंघोळीसाठी गेली होती, त्यावेळी ही घटना घडली. सध्या स्थानिकांकडून इतर मुलांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे. ही घटना साहेबपूर कमल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विष्णुपूर अहोक गंडक नदीजवळ घडली आहे. येथे एकूण 9 मुले आंघोळीसाठी आली होती, त्यापैकी 4 वाचली तर 5 जण बुडाल्याचे सांगण्यात येत आहे.

गंडक नदीत बुडून ५ जणांचा मृत्यू : बुडालेल्यांमध्ये मुंगेर आणि मधेपुरा जिल्ह्यातील तीन मुलांचा समावेश आहे. तर दोन मुले विष्णुपूर आहोक येथील रहिवासी आहेत. ही सर्व मुले बिशनपूर गावातील एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आली होते. याबाबत गावप्रमुख सुबोध कुमार यांनी सांगितले की, 'ही मुले विष्णुपूर अहोक येथील रहिवासी सुरेश सिंह चंद्रवंशी यांच्या घरी लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आले होते. आज हे लग्न होतं पण त्याआधी ही घटना घडली. सर्व मृतांचे वय 14 ते 20 वर्षांच्या दरम्यान आहे. त्यांचा स्थानिक पातळीवर शोध सुरू आहे. आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.'

मृतदेहांचा शोध सुरु : सध्या ही घटना समोर आल्यानंतर गावात शोककळा पसरली असून हजारो लोक गंडक नदीच्या घाटावर येऊन मृतदेहाचा शोध घेत आहेत. विष्णुपूर अहोकच्या या गंडक घाटावर नव्याने बांधलेला पूल उद्घाटनाच्या काही महिन्यांपूर्वीच कोसळला होता, हे विशेष. बुडालेल्यांमध्ये शास्त्रीनगर, मुंगेर येथील रहिवासी संजीव राम यांचा 19 वर्षांचा मुलगा गोलू कुमार आणि सुजित राम यांचा मुलगा हुलचुल, तर मधेपुरा येथील अशोक सिंह यांचा मुलगा ऋषभ कुमार (16) यांचा समावेश आहे. सध्या गोताखोरांनी कमलेश सिंह यांचा मुलगा छोटू कुमार याचा मृतदेह बाहेर काढला आहे.

हेही वाचा :Heart Attack After Marriage : लग्नानंतर आला हर्टअटॅक; नवरदेवाचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details