भुवनेश्वर : ओडिशाच्या कोरापुटमध्ये एक पिकअप व्हॅन उलटल्यामुळे भीषण अपघात झाला. यामध्ये वाहनात प्रवास करणारे दहा जण जागीच ठार झाले, तर १५ लोक जखमी झाले. रविवारी रात्री उशीरा हा अपघात झाला.
चालकाचा ताबा सुटल्याने अपघात..

यामध्ये मृतांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश असल्याचे समजले आहे. तसेच या सर्व छत्तीसगडच्या कुलचा गावातील रहिवासी होत्या. या वाहनातील सर्व प्रवासी ओडिशाच्या सिंधिगुडा गावातून छत्तीसगडमधील आपल्या गावी जात होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी वेगात जात असल्यामुळे चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला.
यामध्ये जखमींना नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांपैकी दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे. तसेच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, जागीच ठार झालेल्या दहा प्रवाशांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा :ट्रकने चिरडल्याने तिघांचा मृत्यू