नवी दिल्ली - पंजाबमधील अमृतसर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली ( Amritsar BSF Jawan Firing ) आहे. एका बीएसएफ जवानाने केलेल्या गोळीबारात पाच जवान शहीद झाले ( 5 BSF Jawan Killed In Firing ) आहेत. तर एक जण गंभीर झाला आहे. गंभीर जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर येथील मुख्यालयात सत्तेप्पा या जवानाने अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात बीएसएफचे चार जवान शहीद झाले. त्यानंतर सत्तेपाने स्वत:वर देखील गोळी मारुन घेतली. त्यात त्याचाही मृत्यू झाला. असे एकूण पाच जवान शहीद झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.