ममल्लापुरम: भारत ब संघाने मंगळवारी 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या ( 44th Chess Olympiad ) खुल्या गटात कांस्यपदक जिंकले ( India B team wins bronze ) आहे. त्याचबरोबर भारत अ संघाने महिला विभागातही तिसरे स्थान पटकावले. भारत ब संघाने अंतिम सामन्यात जर्मनीचा 3-1 असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले.
खुल्या गटात उझबेकिस्तानने नेदरलँडला हरवून सुवर्णपदक ( Uzbekistan beat Netherlands to win gold medal ) पटकावत सर्वांनाच चकित केले. आर्मेनियाच्या बलाढ्य संघाने खुल्या गटात दुसरे स्थान पटकावले. संघाने त्यांच्या अंतिम फेरीच्या सामन्यात स्पेनचा 2.5-1.5 ने पराभव केला.
महिला विभागात, अव्वल मानांकित भारत अ संघाला 11व्या आणि अंतिम फेरीत अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सुवर्णपदकाच्या त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या. कोनेरू हम्पीच्या नेतृत्वाखालील संघाने तिसरे स्थान पटकावले.