महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पश्चिम बंगाल : तृणमूलच्या ४३ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; आज पार पडला सोहळा - कोलकाता मंत्रिमंडळ शपथविधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील उपस्थित होत्या. यापूर्वी ५ मे रोजी ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती...

43 TMC leaders sworn-in as ministers in West Bengal cabinet
पश्चिम बंगालच्या ४३ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; आज पार पडला सोहळा

By

Published : May 10, 2021, 12:26 PM IST

कोलकाता :पश्चिम बंगालमध्ये विजयी झालेल्या तृणमूलच्या आमदारांपैकी ४३ जणांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. आज सकाळी अकराच्या सुमारास राज भवनमध्ये हा शपथविधी समारंभ पार पडला. राज्यपाल जगदीप धानकर यांनी या मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील उपस्थित होत्या. यापूर्वी ५ मे रोजी ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममतांना गोपनीयतेची शपथ दिली होती. ममतांनी यावेळी बांग्ला भाषेमध्ये शपथ घेतली. या शपथ सोहळ्याला पार्थ चॅटर्जी आणि सुब्रत मुखर्जी हे तृणमूल नेते, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि तृणमूलच्या विजयामध्ये मोठा वाटा असणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे उपस्थित होते.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूलचा दणदणीत विजय झाला होता. २००हून अधिक जागा मिळवण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला केवळ ७७ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर डाव्या पक्षांचा गड समजला जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये डाव्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते.

हेही वाचा :कोरोनाची दुसरी लाट : पाहा कोणकोणत्या राज्यांनी केलंय पूर्णपणे लॉकडाऊन

ABOUT THE AUTHOR

...view details