महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Parliament Staff Corona Positive : संसदेतील 400 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत ( India Corona Cases Increased ) आहे. त्यातच आता संसदेतील 400 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली ( Parliament Staff Corona Positive ) आहे. यात लोकसभेतील 200 कर्मचाऱ्यांचा ( loksabha Staff Corona Positive ) समावेश आहे.

Parliament Staff Corona Positive
Parliament Staff Corona Positive

By

Published : Jan 9, 2022, 8:10 PM IST

नवी दिल्ली - भारतात कोरोनाने पुन्हा डोके वर ( India Corona Cases Increased ) काढले आहे. त्यातच आता संसदेतही कोरोनाने शिरकाव केला आहे. संसदेतील 400 कर्मचारी कोरोना संसर्गित झाले ( Parliament Staff Corona Positive ) आहेत. 6 ते 7 जानेवारी दरम्यान संसदेत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन ( Budget Session 2022 ) पार पडणार आहे. त्याच पार्श्वभुमीवर 4 ते 8 जानेवारी दरम्यान संसदेतील 1409 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये 409 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसभेचे 200 कर्मचारी बाधित -

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेतील 200 तर राज्यसभेचे 69 आणि संबंधित विभागाचे 133 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या दोन्ही सभागृहातील कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवले आहे. यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

हेही वाचा -PM Modi chairs COVID Review Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलाविली कोरोना आढावा बैठकहेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details