रायपूर :छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये २२ जवानांना वीरमरण प्राप्त झाले. यावेळी सुमारे ४०० नक्षलवाद्यांनी दीड हजार जवानांच्या एका तुकडीला घेराव घालत त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
'हिडमा'च्या नेतृत्वाखाली ४०० नक्षलवाद्यांचा हल्ला..
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाच्या १,५०० जवानांची एक तुकडी बीजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमाक्षेत्रात शोधमोहीम राबवत होती. या तुकडीमध्ये सीआरपीएफच्या 'कोबरा' बटालियनचे काही जवान, इसकी बस्तरिया बटालियनची एक तुकडी, छत्तीसगड पोलिसांचे जिल्हा रिजर्व गार्ड (डीआरजी) आणि अन्य जवानांचा समावेश होता. तर दुसरीकडे नक्षलवाद्यांच्या बाजूने वांछित माओवादी कमांडर आणि 'पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मीच्या बटालियन नंबर एक'चा नेता हिडमा आणि त्याची सहकारी सुजाता यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४०० नक्षलवादी एकत्र आले होते. या जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे कायम वास्तव्य असल्यामुळे हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी चकमकीमध्ये नक्षलवाद्यांनी हलक्या स्वरुपाच्या मशीन गन्स (एलएमजी) आणि कमी तीव्रतेच्या आयईडींचा वापर केला होता.
जवानांना तीन बाजूंनी घेरत गोळीबार..
नक्षलवाद्यांनी आपल्या कित्येक सहकाऱ्यांचे मृतदेह ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये भरुन परत नेले आहेत. तसेच, सुरक्षा दलांमधील अधिकृत जवानांची संख्या ७९० होती, तर इतर जवान सहाय्यक म्हणून नेण्यात आले होते, असेही एका सूत्राने सांगितले. एका अधिकाऱ्याने सांगितले, की जवानांना तीन बाजूंनी घेरण्यात आले होते. नक्षलवादी जंगलाचा फायदा घेत जवानांवर अंदाधुंद गोळीबार करत होते. या संपूर्ण ऑपरेशनवर बस्तरच्या जगदलपूरमधून राज्य पोलीस आणि केंद्रीय रिजर्व पोलीस दलाचे दोन महानिरिक्षक स्तरावरील अधिकारी लक्ष ठेऊन होते.
गोळीबारामुळे हेलिकॉप्टर उतरवण्यास अडचण..