कोलकाता :उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर सतत कर्तबशील कामांची प्रशंसा करत असतात. आता त्यांनी आणखी एक ट्विट केले आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोलकाता एअरपोर्टवर स्मगलिंगच्या उद्देशाने एका प्रवाशाला पकडण्यात आले. त्यामध्ये एक प्रवाशी 40 हजार डॉलर्स पान मसाला पुडिंगमध्ये लपवून नेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, विमानतळावर तो पकडला गेला. प्रवाशाची ही इनोव्हेटीव्ह आयडिया पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे. अनेकदा ते लोकांना आपल्यातील क्रिएटीव्हीचा वापर योग्य दिशेने देण्याचाही सल्ला देत असतात.
आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओवर ट्विट केले :मिळाळेल्या माहितीनुसार, त्या माणसाला एवढी मोठी रक्कम बेकायदेशीररीत्या बँकॉकला न्यायची होती. तो इतका हुशार होता की, त्याने प्रत्येक पिशवीत पान मसाल्याच्या पाऊचमध्ये डॉलर्स लपवले होते. हा व्हिडिओ कोलकाता विमानतळावरील असल्याचे सांगण्यात येत आहे. आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओवर ट्विट केले की, सर्जनशील विचारांची कमतरता नाही. माझी एवढीच इच्छा आहे की, या गृहस्थाने आपला सर्जनशीलता कायदा मोडण्यासाठी न वापरता काही फलदायी कामासाठी वापरावा.