नवी दिल्ली : जागतिक अनिश्चितता आणि मोठ्या प्रमाणात असलेली आर्थिक मंदी दरम्यान, भारतातील 5 पैकी 4 व्यक्ती 2023 मध्ये नवीन नोकरीच्या शोधात आहेत. बुधवारी एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. लिंक्डइनच्या अहवालानुसार, 18-24 वयोगटातील 88 टक्के नोकरदार, 45-54 वयोगटातील 64 टक्के नोकरदार नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत. पुढे अनिश्चित आर्थिक काळ असूनही, नोकर वर्ग त्यांच्या कौशल्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहेत. प्रगतीच्या संधीचा शोध घेऊन, नागरीक लॉन्ग-टर्म दृष्टीकोनाचा मार्ग अवलंबित आहे.
भारतीयांचा स्वत:वर विश्वास : सर्वेक्षण केलेल्या तीन चतुर्थांश (78 टक्के) कर्मचार्यांनी सांगितले की, जर त्यांनी त्यांची नोकरी सोडली तर, त्यांना अर्ज करण्यासाठी इतर संधी शोधण्यात आत्मविश्वास वाटेल. लिंक्डइन करिअर एक्सपर्ट नीरजिता बॅनर्जी म्हणाल्या की, 'कठीण आर्थिक परिस्थिती असूनही, भारतीय कर्मचार्यांचा विकास आणि पुढे जाण्याच्या क्षमतेवर विश्वास आहे. तर व्यावसायिकांनी हस्तांतरणीय कौशल्ये तयार करून स्वत:मध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे, जे त्यांचे प्रोफाइल अधिक बहुमुखी आणि विविध भूमिकांसाठी अनुकूल बनवेल.'